CET Cell कडून तक्रार निवारणाचे वेळापत्रक जाहीर ; प्रति प्रश्न शुल्क 1 हजार रुपये

सीईटी सेलकडून या वर्षी प्रथमच पदव्युत्तर (B.Ed-M.Ed, M.Ed, B.P.Ed आणि M.P.Ed) उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमध्ये "OBJECTION TRACKER" सोय उपलब्ध करून दिले आहे.

CET Cell कडून तक्रार निवारणाचे वेळापत्रक जाहीर ; प्रति प्रश्न शुल्क 1 हजार रुपये

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शैक्षणिक वर्षे २०२४-२५ (Academic Years 2024-25) करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षामार्फत विविध पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या (Post Graduate Course) प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. CET Cell कडून या वर्षी प्रथमच पदव्युत्तर (B.Ed-M.Ed, M.Ed, B.P.Ed आणि M.P.Ed) उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमध्ये "OBJECTION TRACKER" सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्याद्वारे उमेदवारांकडून सामायिक प्रवेश परीक्षेत दिलेल्या प्रश्न आणि उत्तरांवरील आक्षेपांचा मागोवा घेतला जाईल.  

उमेदवारांना प्रश्नासंबंधीत तक्रार/अक्षेप नोंदवायचा असल्यास त्यांना २७ ते २९ मार्चपर्यंत लॉगिनद्वारे फी भरून सादर करता येणार आहे. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नावर उमेदवाराचा आक्षेप असल्यास, तो उमेदवारांनी वरील वेळापत्रकानुसारच लॉगिन करून सादर करावा. त्यासाठी उमेदवाराला प्रति प्रश्न/प्रति आक्षेप १०००/- रुपये असून ते लॉगिनद्वारे ऑनलाइन भरावे लागतील. 

एकाधिक सत्रांमध्ये घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल समान गुण वर आधारित प्रकाशित केला जाईल. उमेदवाराचा वास्तविक स्कोअर समस्या पेक्षा वेगळा असू शकतो उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. नोंदणीवेळी वापरलेल्या ई-मेलद्वारे उत्तरांसंबंधीचे निवेदन/तक्रारी स्विकारली जाणार आहे. अधिक आणि सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ cetcell.mahacet.org ला भेट द्यावी.