बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा प्रथम वर्षाच्या प्रवेशात येणार अडचणी ; NEP मुळे काय झाला बदल, विद्यापीठ घेणार कार्यशाळा 

2024-25 पासून राज्यातील विद्यापीठांशी संलग्न असणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये एनईपीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा प्रथम वर्षाच्या प्रवेशात येणार अडचणी ; NEP मुळे काय झाला बदल, विद्यापीठ घेणार कार्यशाळा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यात राष्ट्रीय शिक्षणिक धोरणाच्या(National Education Policy)(एनईपी- NEP) अंमलबजावणीस सुरू झाली असून येत्या शैक्षणिक वर्षापासून  राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये एनईपीमुळे झालेल्या बादलांनुसार विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात प्रवेश (Admission to first year) घ्यावा लागणार आहे.त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University)इयत्ता बारावीची (Class XII -12th) परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमांस प्रवेश (Admission to the following courses for Class XII students)घेण्याताना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. 

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत.आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे.मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर कुठे आणि कसा प्रवेश घ्यायचा हे विद्यार्थ्यांसामोरचे आव्हान असते.त्यात आता एनईपी मुळे झालेल्या बदलांमुळे विद्यार्थी व पालकांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील सर्व स्वायत्त महाविद्यालयात एनईपीच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली आहे.चालू शैक्षणिक वर्षांपासून म्हणजेच 2024-25 पासून राज्यातील विद्यापीठांशी संलग्न असणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये एनईपीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एनईपीमुळे विद्यार्थ्यांना आंतरविद्या शाखीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहेत. एक विषय स्पेशन म्हणून प्रथम वर्षांपासून निवडावा की द्वितीय वर्षांपासून निवडावा लागणार याची माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच काही विषय मेजर व काही विषय मायनर असणार आहेत.त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमातून क्रेडिट घ्यावे लागणार आहेत,अशा अनेक लहान मोठ्या गोष्टींची माहिती विद्यार्थी व पालकांना असली पाहिजे.अन्यथा प्रथम वर्षात कोणते विषय निवडावेत, याबाबत विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू शकतो.
 
पूर्वी इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासक्रमासाठी सहा विषय निवडता येत होते. मात्र, एनईपीमुळे त्यात बरेच बदल झाले आहेत.परिणामी इयत्ता बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षांच्या प्रवेशाबाबत योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यापीठातर्फे लवकरच कार्यशाळा घेतली जाणार आहे. प्रामुख्याने अनेक कनिष्ठ महाविद्यालये ही वरिष्ठ महाविद्यालयांना जोडलेली असतात,अशा महाविद्यालयांमध्ये या कार्यशाळा घेण्याचे नियोजन आहे.त्यामुळे विद्यार्थी व पालकांना तज्ज्ञ व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करता येईल.

---------------------------------

इयत्ता बारावी उत्तीर्ण होऊन प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एनईपी अंतर्गत झालेल्या बदलांचा विचार करून विषय निवड काशी करावी,यासह विविध महत्त्वाच्या विषयावर विद्यापीठातर्फे मार्गदर्शन केले जाणार आहे.त्यादृष्टीने विद्यापीठाची तयारी सुरू आहे.रिसोर्स पर्सनची निवड आणि कार्यशाळेचा कालावधी याबाबतची माहिती लवकरच विद्यापीठाकडून प्रसिध्द केली जाईल.
- डॉ. पराग काळकर,प्र.कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 
----------------------------------------------------

विद्यार्थी हा शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा घटक आहे.एनईपीमधील बदलाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी निश्चितच विद्यापीठातर्फे सांगितल्या जातील.
- डॉ. देविदास वायदंडे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ