फिजिओथेरपी परिषदेला उच्च न्यायालयाने फटकारले; अंध विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचे आदेश

जील जैन या ४० टक्क्यांपर्यंत अंधत्व असलेल्या विद्यार्थ्याला फिजिओथेरपी कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी परवांनगी दिली आहे.

फिजिओथेरपी परिषदेला उच्च न्यायालयाने फटकारले; अंध विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचे आदेश
Mumbai High Court

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

वैद्यकीय शिक्षण (Medical Education) क्षेत्रासाठी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना दृष्टिहीन विद्यार्थ्याला फिजिओथेरपी अभ्यासक्रम (Physiotherapy) करण्याची परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे अशी परवानगी नाकारलेल्या महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार आणि भौतिकोपचार परिषदेलाही न्यायालयाने  खडसावले आहे. (MAHARASHTRA STATE COUNCIL FOR OCCUPATIONAL THERAPY & PHYSIOTHERAPY)

न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती निला गोखले यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात, जील जैन या ४० टक्क्यांपर्यंत अंधत्व असलेल्या विद्यार्थ्याला फिजिओथेरपी कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी परवांनगी दिली आहे. जील जैन या विद्यार्थ्यांने या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

ITI आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! शिकत असतानाच उद्योग समूहांमध्ये घ्या प्रशिक्षण

फिजिओथेरपिस्टना ऑपरेशन  थिएटर, सर्जिकल युनिट्स आणि आयसीयूमध्ये महत्वाची भूमिका बजावावी लागते. त्यामुळे फिजिओथेरपीच्या अभ्यासात कोणत्याही प्रमाणात अंधत्व किंवा दृष्टीदोष यांना परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे म्हणत परिषदेने जीलला अभ्यासक्रमात प्रवेशाची परवानगी नाकारली होती. 

यावर खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केले की, "अनेक विद्यार्थी, वकील, सहाय्यक आणि इतर आहेत जे दृष्टिहीन आहेत आणि तरीही ते भारतातील अनेक न्यायालयांमध्ये यशस्वीरित्या कार्यरत आहेत. ज्यांना मदतीची सर्वाधिक गरज आहे त्यांना मदत करण्याचे मार्ग शोधणे हा समाज आणि राज्य सरकार म्हणून आमचा सामूहिक प्रयत्न आहे."  नियामक परिषदेच्या या दृष्टिकोनावर आम्ही आमची तीव्र नाराजी व्यक्त केली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2