मुलगी शिकली प्रगती झाली : उच्च शिक्षणात मुलांपेक्षा मुलींनी घेतली आघाडी

देशात महाविद्यालयांच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मुलगी शिकली प्रगती झाली : उच्च शिक्षणात मुलांपेक्षा मुलींनी घेतली आघाडी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात (Primary and Secondary Education) मुलींचा सहभाग वाढत असताना आता उच्च शिक्षणातही (higher education) हेच सकारात्मक चित्र दिसत आहे.ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन (AISHE-Report) ने २०२१-२०२२ या वर्षासाठी केलेला अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे.या अहवालानुसार गेल्या आठ वर्षांत मुलांपेक्षा मुलींनी उच्च शिक्षणासाठी अधिक नोंदणी केली आहे.मुलींचीची नोंदणी पाच वर्षांत १८.७% ने वाढली आहे.तसेच देशात महाविद्यालयांच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Maharashtra ranks second in number of colleges)

AISHE च्या अहवालानुसार उच्च शिक्षणात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ९१ लाखाने वाढली आहे. या मध्ये ५५ टक्के मुलींचे प्रमाण आहे.  ताज्या सर्वेक्षण अहवालानुसार एकूण ४.३३ कोटी नोंदणीपैकी ४८ % म्हणजेच २.०७ कोटी महिला आहेत. वर्ष २०१४-१५  मध्ये, एकूण ३.४२ कोटी नोंदणीपैकी महिलांची टक्केवारी ४६ टक्के होती.

हेही वाचा : TCS वर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी नाखूश; विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर मोडला करार

अहवालानुसार २०१४-१५ पासून महिलांच्या नोंदणीत सातत्याने वाढ होत आहे.मुलींची  नोंदणी पाच वर्षांत १८.७% ने वाढली आहे. २०२०-२१ मध्ये २.०१ कोटी आणि २०१७-१८ मध्ये १.७४ कोटींवरून २०२१-२२ मध्ये २.०७ कोटी आहे.२०१४-१५ पासून एकूण नोंदणीमध्ये (९१ लाख) मुलींचा सहभाग ५५% आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या नोंदणीत अधिक वाढ झाली आहे. 

पदवी, पदव्युत्तर, एमफिल आणि पीएचडी स्तरावर नोंदणी केलेल्या एकूण ५७.१८ लाख विद्यार्थ्यांपैकी सुमारे ५२.१ टक्के मुली आहेत. पदवी स्तरावर एकूण नोंदणी केलेल्या विद्यार्थिनींपैकी  सुमारे ५१ टक्के विद्यार्थिनी विज्ञान शाखेतील आहेत. २०२०-२१ या वर्षात ५५.४८ लाख विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलात्यापैकी 53.1% विद्यार्थिनी होत्या.

विज्ञान शाखेतील पीजी स्तरावर, नोंदणी केलेल्या ७.५२ लाख विद्यार्थ्यांपैकी ६१.२% महिला आहेत. विज्ञानातील पीएचडी प्रोग्राममध्ये नोंदणी केलेल्या ४५,३२४ विद्यार्थ्यांपैकी निम्म्याहून अधिक (६२%) मुली आहेत, तर केवळ ३९% मुले आहेत.
-------------------

महाविद्यालयांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर 

AISHE सर्वेक्षणानुसार उच्च शिक्षणासाठी उत्तर प्रदेशमध्ये देशातील सर्वाधिक महाविद्यालये आहेत. त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकचा क्रमांक लागतो. ४ हजार ६९२ महाविद्यालयांसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.उत्तर प्रदेशमध्ये ८ हजार ३७५  महाविद्यालये आहेत. येथे प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे ३० महाविद्यालये आहेत. कर्नाटक राज्य  ४ हजार ४३० महाविद्यालयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर राजस्थान ३ हजार ९३४ महाविद्यालयांसह चौथ्या स्थानावर आहे.तामिळनाडू २ हजार ८२९ महाविद्यालयांसह पाचव्या स्थानावर आहे.