प्राध्यापकांना स्थानिक भाषेतून प्रशिक्षण देण्याचे युजीसीचे आदेश 

UGC ने सर्व संस्थांना प्रत्येकी एक शिक्षक नियुक्त करण्यास सांगितले आहे. ज्यांना मास्टर ट्रेनर म्हणून तयार केले जाईल.त्यानंतर ते संस्थेच्या इतर शिक्षकांनाही प्रशिक्षण देतील.

प्राध्यापकांना स्थानिक भाषेतून प्रशिक्षण देण्याचे युजीसीचे आदेश 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यापीठांसह देशभरातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये स्थानिक किंवा मातृभाषेतून अभ्यासक्रम (Course in local or mother tongue)सुरू करण्याचा उपक्रम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून प्राध्यापकांना स्थानिक भाषेतून विशेष प्रशिक्षण (Special training of faculty in local language)देण्यात यावे,असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोग (University Grants Commission-UGC ) ने सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना दिले आहेत. 

देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांना लिहिलेल्या पत्रात UGC ने म्हटले आहे की, शिक्षकांना मातृभाषेत शिकवण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय भाषा समितीच्या सहकार्याने फेब्रुवारी-मार्च महिन्यात हा कार्यक्रम सुरू होईल.यासाठी  UGC ने सर्व संस्थांना प्रत्येकी एक शिक्षक नियुक्त करण्यास सांगितले आहे. ज्यांना मास्टर ट्रेनर म्हणून तयार केले जाईल.त्यानंतर ते संस्थेच्या इतर शिक्षकांनाही प्रशिक्षण देतील. मातृभाषेतून शिकवण्याचा उपक्रम तेव्हाच पुढे जाऊ शकेल, जेव्हा शिक्षकही मातृभाषेतून शिकवण्यासाठी तयार होतील, असे UGC ने पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा : TCS वर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी नाखूश; विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर मोडला करार

या उपक्रमामुळे देशातील उच्च शिक्षणाचे एकूण नोंदणी प्रमाण (GER) वाढेल, जे सध्या सुमारे २५ टक्के आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात २०३५ पर्यंत ते ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या देशातील मोठ्या संख्येने विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत कारण त्यांचे पूर्वीचे शिक्षण मातृभाषेतून किंवा स्थानिक भाषेत होते. अशा परिस्थितीत त्यांना जे अभ्यासक्रम शिकायचे आहेत ते त्यांच्या स्थानिक किंवा मातृभाषेत चालवले जात नाहीत."असेही UGC ने पत्रात म्हटले  आहे. 

 UGC ने सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना स्थानिक किंवा मातृभाषेत तयार केलेले अभ्यास साहित्य योग्य प्रकारे तपासण्याचा सल्ला दिला आहे.जेणेकरून मातृभाषेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तो विषय नीट समजू शकेल.दरम्यान, विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिकवण्यासाठी संस्थांमध्ये शिक्षकांची वेगळी नियुक्ती केली जाणार नाही.तर विद्यमान शिक्षकांना यासाठी तयार केले जाईल,असे UGC ने स्पष्ट केले आहे.