राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी पाच लाखांचा अपघात विमा, वैद्यकीय विमाही काढणार; राज्य सरकारचा निर्णय

उच्च शिक्षण विभागाकडून सोमवारी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. विमा योजनांसाठी उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.

राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी पाच लाखांचा अपघात विमा, वैद्यकीय विमाही काढणार; राज्य सरकारचा निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने (Higher and Technical Education) राज्यातील अकृषी विद्यापीठे, तंत्र विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी (Students) नव्या स्वरुपात विद्यार्थी जीवन व अपघात विमा योजना (Insurance Scheme) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना पाच लाखांचा अपघात विमा वर्षभरासाठी केवळ ६२ रुपयांत मिळणार आहे. तर एक लाखाच्या विम्यासाठी केवळ २० रुपये मोजावे लागतील. विद्यार्थी वैद्यकीय विमा योजनेत ४२२ रुपयांत दोन लाखांचे विमा संरक्षण मिळणार आहे. (Maharashtra Government)

 

उच्च शिक्षण विभागाकडून सोमवारी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. विमा योजनांसाठी उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी आयआरडीए परवानाधारक विमा कंपनी निवडण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार विद्यार्थी अपघात विमा योजनेसाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. ही कंपनी २० रुपयांमध्ये एक लाखाचे विमा संरक्षण देणार आहे.

भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा; कायदेशीर लढाई जिंकली

विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा योजनेतील पाच लाखांच्या विमा संरक्षणासाठी ६२ रुपये भरावे लागणार आहेत. नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून एक वर्षांसाठी हे विमा संरक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत विद्यार्थ्यासोबतच त्याच्या पालकांपैकी एका व्यक्तीलाही हे संरक्षण मिळणार आहे. तर विद्यार्थी वैद्यकीय विमान योजनेत दोन लाखांचे संरक्षण असेल. त्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीची निवड करण्यात आली असून ४२२ रुपये भरावे लागणार आहेत.

 

तिन्ही योजना ऐच्छिक स्वरुपाच्या असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालये यांच्याकडून तीन विमा कंपन्यांपैकी विमा दर तसेच विमा संरक्षण यासाठी योग्य वाटत असलेल्या कंपनीची निवड करून या योजना विद्यार्थ्यांसाठी लागू कराव्यात, असे शासनाने म्हटले आहे. संबंधित विमा कंपन्यांचे विमान संरक्षण दर तीन वर्षांसाठी स्थिर असतील.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k