भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा; कायदेशीर लढाई जिंकली

महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात सुरू केलेल्या शाळेचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे.

भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा; कायदेशीर लढाई जिंकली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

देशातील मुलींची पहिली शाळा सुरू झालेल्या भिडे वाड्याचे (Bhide Wada) राष्ट्रीय स्मारक (National Monument) व्हावे, यासंदर्भातील मार्ग मोकळा झाला असून राज्य शासनाने (Maharashtra Government) व पुणे महापालिका (PMC) प्रशासनाने न्यायालयीन लढाई जिंकली आहे. त्यामुळे येथे स्त्री मुक्तीचे स्मारक उभे राहावे, ही अनेक वर्षांची मागणी मान्य होणार आहे. त्याबाबत सर्व क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात असले तरी या विषय अतिशय संथ गतीने हाताळला गेला. या बद्दल सामाजिक कार्यकर्त्यांकडून नाराजीही व्यक्त केली जात आहे.

 

महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरू केलेल्या शाळेचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. दरवर्षी त्यासाठी  आंदोलनेही काढण्यात आली. मात्र, या जागेतील भाडेकरूंमूळे निर्माण झालेला वाद मिटत नसल्याने अडचणी येत होत्या. मात्र, उच्च न्यायालयाने याबाबत पालिकेच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे येथे राष्ट्रीय स्मारक उभे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यावर सर्वकहा क्षेत्रातून आनंद व्यक्त केला जात असून राजकीय व सामाजिक क्षेत्रातून  प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

विद्यार्थ्यांनो, अनामत रक्कम परत घेताय ना? नाहीतर होतील खर्च, शासनाने ठरवले धोरण

 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढावा म्हणाले, उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय दिल्याने अनेक वर्षांपासून रखडलेला निर्णय पुढे सरकला आहे. त्यांचे निश्चितच समाधान वाटते. परंतु,लोकसभेत महिलांना  प्रतिनिधीतत्व देण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र, भिडे वाड्याच्या स्मारकाबाबत खळखळ केली जाते.  हे अत्यंत खेदजनक आहे. तसेच हा विषय ज्या मंद गतीने हाताळला जात आहे. ती आपल्याला शोभणारी नाही.

 

सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार म्हणाले, भिडेवाड्याला १ जानेवारी १९९८ रोजी १५० पूर्ण झाले होते. त्यावेळीचा या भिडेवाड्याचे स्मारक व्हावे, या मागणीसाठी फुले वाडा ते भिडे वाडा दरम्यान भव्य रॅली काढण्यात आली होती.त्यात बाबा आढावा यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकते सहभागी झाले होते. सध्या या स्मारकाला १७५ वर्षे पूर्ण होत आहेत.त्यामुळे या बाबत निर्णय घेण्यास २५ वर्षांचा कालावधी लागला यांचा खेद वाटतो. स्त्रीमुक्तीची पहाट ज्या ठिकाणाहून झाली आशा समतेच्या आणि सर्वांना प्रेरणा देणाऱ्या भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हायला हवे. स्मारक उभे करण्यामागील अडथळे दूर झाले असतील तर स्मारकाचे काम वेगाने करावे.

पुणेकरांसाठी ऐतिहासिक दिवस 

पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मुलींची पहिली शाळा म्हणजे भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी पालकमंत्री या नात्याने मी सातत्याने प्रयत्नशील होतो. शासनाकडून निधीची तरतूद झाल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी भिडेवाड्यासंदर्भातील शासनाच्या भूमिकेसंदर्भात माहिती दिली होती. तसेच, उच्च न्यायालयात यासंदर्भात शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंतीही केली होती. त्यानुसार महाधिवक्त्यांनी उच्च न्यायालयात शासनाची प्रभावी भूमिका मांडल्याने उच्च न्यायालयाने ही भिडेवाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने निकाल दिला आहे. लवकरच आता भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर होईल, याबद्दल सर्व पुणेकरांचे अभिनंदन.

- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे माजी पालकमंत्री

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k