डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया वादात ? पुण्यातील पाच उमेदावर शर्यतीत

यापूर्वी मुंबई ,पुणे, गोंडवाना आदी विद्यापीठांच्या कुलगुरू निवड यादीत शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची नावे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे निवडीबाबत नेमके कोणते निकष लावले जातात, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया वादात ?  पुण्यातील पाच उमेदावर शर्यतीत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Vice Chancellor Selection Process) सुरू झाली असून मुलाखतीसाठी निवडण्यात आलेल्या २४ उमेदवारांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ५ उमेदवारांचा समावेश (Inclusion of 5 candidates from Savitribai Phule Pune University) आहे. मात्र, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींची नावे कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी निवडण्यात आल्यामुळे ही निवड प्रक्रिया वादात सापडण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांचा कार्यकाल येत्या 31 डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे.त्यामुळे नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एआयसीटीईचे माजी अध्यक्ष  डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू शोध समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे सदस्य सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्रग्रस्तगी आहेत. समितीकडे प्राप्त झालेल्या १०० अर्जांपैकी २४ जणांचे अर्ज छाननीनंतर शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.मनोहर चासकर, भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय ढोले, बायोटेक्नॉलॉजी विभागाचे डॉ.राजू गच्छे, भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.संजय जाडकर, विलास खरात यांचा समावेश आहे. येत्या २९ नोव्हेंबर रोजी या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.त्यातून अंतिम मुलाखतीसाठी पाच उमेदवार निवडले जाणार आहेत. 

हेही वाचा : प्राध्यापकांच्या प्रश्नासाठी नवप्राध्यापक संघटनेचा पुन्हा यल्गार

निवड समितीने २४ उमेदवारांची यादी शॉर्टलिस्ट केली असली तरी त्यात अवैध गुणवाढ प्रकरणात कलम ४२० चा गुन्हा दाखल असलेल्या प्राध्यापकांचा समावेश आहे.तसेच परीक्षा विभागाच्या कामात अनियमितता करणाऱ्या व्यक्तीचा समावेश असल्याने निवड समितीने शॉर्टलिस्ट केलेल्या नावांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच यापूर्वी मुंबई ,पुणे, गोंडवाना आदी  विद्यापीठांच्या कुलगुरू निवड यादीत शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची नावे मराठवाडा विद्यापीठाच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे निवडीबाबत नेमके कोणते निकष लावले जातात, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.
---------------------
 कुलगुरू शोध समितीने मुलाखतीसाठी निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे : 


प्रा. हिरेंद्र सिंग, प्रा.विलास खरात, प्रा.सतीश शर्मा, प्रा.राजीव गुप्ता, प्रा.सुभाष कोंडवार, डॉ.एस के सिंग डॉ.गणेशचंद्र शिंदे, डॉ.विजय फुलारी प्रा.संजय चव्हाण, प्रा.राजेंद्र काकडे प्रा.भारती गवळी, प्रा.इंद्रप्रसाद त्रिपाठी , डॉ.अनिल चांदेवार, वरिष्ठ प्रा.ज्योती जाधव, डॉ. दत्तात्रय गायकवाड, डॉ.मनोहर चासकर, प्रा.राजेंद्र सोनकवडे, प्रा.उदय अन्नापुरे प्रा.अशोक महाजन,प्रा. संदेश जाडकर, प्रा.राजू गच्छे,प्रा. डॉ. संजय ढोले, डॉ.सतीश पाटील,प्रा. प्रमोद माहुलीकर ,