CSEET जुलै 2024 साठी परीक्षेची तारीख जाहीर;15 जून पर्यंत अर्ज करता येणार 

CSEET परीक्षा वर्षातून  जानेवारी, मे, जुलै आणि नोव्हेंबर अशी चार वेळा घेतली जाते.

CSEET जुलै 2024 साठी परीक्षेची तारीख जाहीर;15 जून पर्यंत अर्ज करता येणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI )कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट (CSEET) जुलै 2024 साठी परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. CSEET  जुलैची परीक्षा 6 जुलै रोजी होणार आहे. इच्छूक उमेदवार 15 जून 2024 पर्यंत अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जाऊन अर्ज करू शकतात.

सीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामसाठी इच्छुक उमेदवारांसाठी सीएसईईटी परीक्षा खूप महत्त्वाची आहे. CSEET परीक्षा वर्षातून  जानेवारी, मे, जुलै आणि नोव्हेंबर अशी चार वेळा घेतली जाते. 12वी परीक्षा उत्तीर्ण झालेले किंवा त्याच्या समकक्ष पदवी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी किंवा यावर्षी 12वी ची परीक्षा दिलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

CSEET 2024 जुलैची परीक्षा ऑनलाइन प्रॉक्टोर्ड पद्धतीने घेतली जाईल. परीक्षा दोन तासांची असेल. परीक्षेचे चार विभाग असतील, ज्यामध्ये 200 गुण सर्व विभागांमध्ये समान प्रमाणात विभागले जातील. विद्यार्थ्यांना एकूण 120 बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसते. चुकीच्या उत्तरांसाठी गुण कापले जात नाहीत.