जेईई मेन एप्रिल 2023 चा निकाल जाहीर

उत्तर प्रदेशातील मलय केडियाने 300 गुणांसह JEE मेन 2023 सत्र 2 मध्ये अव्वल स्थान पटकावले. परीक्षेत पहिले  2,50,000 विद्यार्थी NITs, IIITs आणि GFTIs मध्ये प्रवेशासाठी,  JEE Advanced 2023 नोंदणीसाठी पात्र ठरतील.

जेईई मेन एप्रिल 2023 चा निकाल जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने शनिवारी  जेईई मेन एप्रिल 2023 चा निकाल जाहीर केला. अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर निकाल पाहण्यासाठी उपलब्ध आहे . उत्तर प्रदेशातील मलय केडियाने 300 गुणांसह JEE मेन 2023 सत्र 2 मध्ये अव्वल स्थान पटकावले. परीक्षेत पहिले  2,50,000 विद्यार्थी NITs, IIITs आणि GFTIs मध्ये प्रवेशासाठी,  JEE Advanced 2023 नोंदणीसाठी पात्र ठरतील. या विद्यार्थ्यांना JoSAA 2023 नोंदणी पूर्ण करावी लागेल, अशी माहिती एनटीए कडून देण्यात आली आहे.  

 JEE सोबत nta.ac.in वर NTA च्या अधिकृत साईटवर जेईई मेन परीक्षा 2023 सत्र 2 साठी सर्व उमेदवारांना स्कोअरकार्ड तपासता येईल. मुख्य वेबसाइटवर  निकालांसोबतच, अंतिम उत्तर की, टॉपर्सची यादी, ऑल इंडिया रँक लिस्ट, कट ऑफ, पर्सेंटाइल आणि इतर माहिती NTA JEE च्या अधिकृत वेबसाइटवर देखील प्रसिद्ध केली जाईल. IIT JEE Main 2023 स्कोअरकार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख नावाची त्यांची लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरावी लागतील.

   IIT JEE मुख्य परीक्षा 2023 एप्रिल सत्र 06, 08, 10, 11, 12, 13 आणि 15 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले होते. यापूर्वी जेईई मेन 2023 सत्र 1 जी जानेवारीमध्ये घेण्यात आली होती, या परीक्षेत च्या 9 लाख 6 हजार विद्यार्थ्यांनी जेईई-मेन एप्रिल परीक्षेसाठी अर्ज केले होते. तर एप्रिलच्या सत्रासाठी ३ लाख २५ हजारांहून अधिक नवीन विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. याचाच अर्थ  या वर्षी दोन्ही सत्रांमध्ये 11 लाखांहून अधिक युनिक विद्यार्थ्यांनी जेईई-मेन-2023 साठी अर्ज केले आहेत. दरम्यान, जेईई मेन 2023 जानेवारी सत्रात 100 पर्सेंटाइल असलेले 20 विद्यार्थी होते. कटऑफ परीक्षेला बसलेल्या एकूण उमेदवारांच्या संख्येवर अवलंबून असतो. या वर्षी, जेईई मेन्स कट-ऑफ 2023 पीडब्ल्यूडी श्रेणी वगळता सर्व श्रेणींसाठी वाढला आहे.

वेगवेगळ्या श्रेणींमध्ये जेईई मेन्स कट ऑफ खालीलप्रमाणे आहेत-

सामान्य- 90.7788642, EWS- 75.6229025, OBC- 73.6114227, SC- 73.6114227, ST- 37.2348772 NTA ने दिलेल्या सूचनेनुसार JEE Main 2023 अंतर्गत पुरवण्यात आलेल्या answer key ला उमेदवार  उमेदवार आक्षेप घेऊ  शकतात. त्यासाठी प्रति प्रश्न २०० रु. शुल्क आकारण्यात येणार आहेत. जे आक्षेप योग्य असल्याचे आढळतील आशा विद्यार्थ्यांना शुल्क  परत केले जाईल. प्राप्त झालेल्या सर्व आक्षेपांचा विचार करून अंतिम JEE मुख्य answer key  2023 NTA द्वारे जारी केली जाईल. त्यानंतर मात्र उमेदवारांकडून आक्षेप स्वकारले जाणार नाहीत.  दरम्यान, टॉपर्सची यादी NTA द्वारे जारी केली गेली नाही.  परंतु  कोचिंग संस्थांद्वारे तयार करण्यात आलेल्या टॉपर्सच्या यादीनुसार  मलय केडिया, एस. वेंकट कुलंडीन्य, आशिक स्टेन्नी, फ्रेडी जॉर्ज रॉबिन हे उमेदवार टॉप 4 मध्ये आहेत.