अभ्यास न करता अन् टक्केवारीशिवाय, 'या' मार्गाने मिळावा मद्रास आयआयटीमध्ये प्रवेश

क्रिडा क्षेत्र गाजवणाऱ्या विद्यार्थ्यांना मद्रास आयआयटीत प्रवेश मिळवणे झाले सोपे

अभ्यास न करता अन् टक्केवारीशिवाय, 'या' मार्गाने मिळावा मद्रास आयआयटीमध्ये प्रवेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( IIT) मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर भरपूर अभ्यास आणि चांगल्या टक्केवारीशिवाय आता तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करणे आवश्यक आहे. क्रिडा क्षेत्र गाजवणाऱ्या विद्यार्थ्याला आयआयटीमध्ये प्रवेश मिळणे आता सोपे झाले आहे.  देशातील सर्वोत्तम आयआयटी म्हणून ओळख निर्माण करणारी मद्रास आयआयटी (Madras IIT) संस्था शैक्षणिक सत्र 2024-25 (Academic Session 2024-25) पासून क्रीडा कोट्याअंतर्गत (sports quota)उमेदवारांना प्रवेश देणार आहे. आजपर्यंत देशभरातील कोणत्याही संस्थेत क्रीडा कोट्यातून प्रवेश दिला जात नव्हता. 

अशी राबवली जाणार प्रक्रिया

प्रत्येक UG कार्यक्रमात आयआयटी मद्रास द्वारे दोन अतिरिक्त जागा तयार केल्या जातील आणि उमेदवारांना क्रीडा कोट्याअंतर्गत प्रवेश दिला जाईल. स्पोर्ट्स कोटा अंतर्गत यूजी प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी, उमेदवारांना जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेत बसावे लागेल. यानंतर तुमची कामगिरी आणि खेळात मिळालेली पदके इत्यादींच्या आधारे क्रीडा कोट्यासाठी गुणवत्ता यादी तयार केली जाईल. क्रीडा कोट्यातील जागा जोशा पोर्टलद्वारे उपलब्ध होणार नाहीत जे सर्व आयआयटीमध्ये प्रवेशासाठी ऑनलाइन सीट वाटप प्रदान करते. यासाठी 'स्पोर्ट्स रँक लिस्ट' (SRL) तयार केली जाईल आणि येथे  कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांना जागा दिली जाईल, अशी माहिती आयआयटी मद्रासचे संचालक प्रोफेसर व्ही. कामकोटी यांनी दिली आहे.

आत्तापर्यंत दिल्ली विद्यापीठासह देशातील काही प्रमुख विद्यापीठांमध्ये स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत  प्रवेश दिला जात होता, परंतु आता हा उपक्रम आयआयटी मद्रासनेही उचलला आहे.  जेणेकरून विद्यार्थी अभियांत्रिकीमध्ये अधिक चांगली कामगिरी करून त्यांचे करिअर सुधारू शकतील.