पहिला 'मनोहर पर्रीकर यंग सायंटिस्ट पुरस्कार' डॉ. मथवराज एस यांना जाहीर
डॉ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारासाठी चांद्रयान-३ मोहिमेचे पॉवर डिसेंट ट्रॅजेक्टोरी डिझाइन करणारे डॉ. मथवराज यांची निवड केली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नावाने दिला जाणारा पहिला 'मनोहर पर्रीकर यंग सायंटिस्ट पुरस्कार' (Manohar Parrikar Young Scientist Award) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) यूआर राव उपग्रह केंद्राचे डॉ. मथवराज एस (Dr. S. Mathavaraj) यांना देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी ही माहिती दिली.
डॉ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारासाठी चांद्रयान-३ मोहिमेचे पॉवर डिसेंट ट्रॅजेक्टोरी डिझाइन करणारे डॉ. मथवराज यांची निवड केली आहे. या पुरस्कारासाठी १०६ शास्त्रज्ञाचे अर्ज आले होते. पाच लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च रोख पुरस्कार आहे. हा पुरस्कार १३ डिसेंबर रोजी देण्यात येणार आहे. चांद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँडिंग करण्यासाठी मार्ग तयार करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आल्याचा आनंद आहे, असे सावंत म्हणाले.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
eduvarta@gmail.com