बारावीनंतर डिफेन्स इंजिनिअरिंग : करिअरच्या वेगळ्या वाटा 

  डिफेन्स इंजिनिअरिंग ' हा मुलांसाठी खूप चांगला करिअरचा पर्याय आहे. पण याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये फारशी  जागृती नाही.' डिफेन्स इंजिनिअरिंग 'मध्ये आर्मी आणि नेव्हीसाठी अभियंते घडविले जातात.

बारावीनंतर डिफेन्स इंजिनिअरिंग : करिअरच्या वेगळ्या वाटा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नुकताच बारावीचा निकाल जाहीर (fter 12th courses) झाला असून बारावीनंतर  शक्यतो अनेक विद्यार्थ्यांचा मेडिकल, इंजिनिअरिग, आर्किटेक्चर, सीए, डीएड, बीएड, आयसीडब्ल्यू, मॅनेजमेंट कोर्सेस, डिप्लोमा किंवा पारंपरिक पद्धतीने पदवीचे शिक्षण घेण्याकडेच अधिक कल असतो. पण बारावी उत्तीर्ण झाल्यावर डिफेन्स इंजिनिअरिंग (defence engineering) सारखे काही वेगळे पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामुळे विद्यार्थी आपलं चांगलं करिअर घडवू शकतात, अशाच काही करिअरच्या वेगळ्या वाटांबद्दल करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर (career guide vivek velankar) यांनी एज्युवार्ता'शी संवाद साधला.

हेही वाचा: फार्मसीमधील करिअरच्या नव्या वाटा.. 


     विवेक वेलणकर म्हणाले ,  डिफेन्स इंजिनिअरिंग ' हा मुलांसाठी खूप चांगला करिअरचा पर्याय आहे. पण याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये फारशी  जागृती नाही.' डिफेन्स इंजिनिअरिंग 'मध्ये आर्मी आणि नेव्हीसाठी अभियंते घडविले जातात.हा अभ्यासक्रम देशात फक्त मोजक्याच विद्यालयांमध्ये शिकवला जातो. पुण्याजवळील दापोडी येथील' डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ' कॉलेज मध्ये, मध्य प्रदेशात मऊ या सह सिकंदराबाद येथे  विद्यार्थ्यांना डिफेन्स इंजिनिअरिंगचे शिक्षण घेता येते.

       या महाविद्यालयांमधून इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त संरक्षण क्षेत्रात संधी मिळते. विशेष म्हणजे हा कोर्स मोफत आहे.या कोर्ससाठी बारावीत पीसीएम ग्रुपमध्ये मान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याने जेईई मेन्स परीक्षा दिलेली असावी. जेईई मेन्स परीक्षेच्या गुंणाच्या आधारावर अर्ज शॉर्ट लिस्ट करून त्यातून विद्यार्थ्यांना  एसएसबी (सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड ) ही मुलाखत द्यावी लागते. या मुलाखतीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश मिळतो. हा अभ्यासक्रम फक्त मुलांसाठी असून मुलींना यात प्रवेश घेता येत नाही, असेही वेलणकर यांनी सांगितले.