‘एनडीए’तील कॅडेट प्रथम महाले याचा मृत्यू; बॉक्सिंग खेळताना डोक्याला दुखापत

एनडीएकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, स्कॉड्रन कॅडेट कॅप्टन प्रथम महाले याचा मृत्यू झाला आहे. तो महाराष्ट्राचा रहिवाशी होता.

‘एनडीए’तील कॅडेट प्रथम महाले याचा मृत्यू; बॉक्सिंग खेळताना डोक्याला दुखापत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील (Pune) खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (NDA) प्रशिक्षण घेणारा महाराष्ट्रातील कॅडेट प्रथम महाले (Pratham Mahale) याचा बुधवारी पहाटे मृत्यू झाला. बॉक्सिंग (Boxing) स्पर्धेदरम्यान दोन दिवसांपुर्वी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. कमांड रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

एनडीएकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, स्कॉड्रन कॅडेट कॅप्टन प्रथम महाले याचा मृत्यू झाला आहे. तो महाराष्ट्राचा रहिवाशी होता. तो १४५ व्या तुकडीत १८ एप्रिल २०२१ रोजी एनडीएमध्ये दाखल झाला होता.

सीएचबी प्राध्यापक दसरा-दिवाळीला उपाशी ?

दि. १६ ऑक्टोबर रोजी इंटर स्कॉड्रन बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान प्रथमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला पुण्यातील कमांड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

 

डोक्यातील अंतर्गत रक्तस्त्राव रोखण्यासाठी शस्त्रक्रियाही करण्यात आली. पण अनेक प्रयत्न करूनही प्रथमला वाचू शकला नाही. उपचारादरम्यान प्रथमचा बुधवारी (दि. १८) पहाटे पाच वाजता कमांड रुग्णालयात मृत्यू झाला.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k