UGC चे बनावट सोशल मीडिया अकाउंट? कारवाईचा दिला इशारा 

UGC  चे बनावट आणि क्लोन अकाउंट बनवून ती ऑपरेट करणाऱ्यांवर तसेच ओरिजनल अकाउंटवरील माहिती चोरणाऱ्यांविरोधात UGC  कायदेशीर कारवाई करत आहे.

UGC चे बनावट सोशल मीडिया अकाउंट? कारवाईचा दिला इशारा 
UGC Social Media

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सोशल मीडिया (Social Media) अकाऊंट हॅक झाल्याची तक्रार वजा माहिती फेसबुक वॉल वर नेहमीचेच झाले आहे. एखाद्या व्यक्तीचे सोशल मीडिया अकाउंट  हॅक करणे, त्यावरून पैशांची मागणी करणे, तोतया  बनून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे, संबंधित अकाउंटच्या खऱ्या मालकाची सर्व माहिती मिळवून त्याद्वारे गैरकृत्ये करणे असे प्रकार सध्या खूप वाढले आहेत. आता विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) चे बनावट अकाउंट बनवून त्याद्वारे चुकीची माहिती देणे, ओरिजनल अकाउंट वरून माहिती चोरणे असे प्रकार उघडकीस आले आहेत. (University Grant Commission)

UGC ने त्यांच्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. "UGC  चे बनावट आणि क्लोन अकाउंट बनवून ती ऑपरेट करणाऱ्यांवर तसेच ओरिजनल अकाउंटवरील माहिती चोरणाऱ्यांविरोधात UGC  कायदेशीर कारवाई करत आहे," असे निर्देश UGC ने दिले आहेत. तसेच UGC  ने आपल्या वापरकर्त्यांना काही महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. 

IIT Admission : ‘आयआयटी’च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा

UGC च्या सोशल मीडिया अकाऊंटला भेट देताना  योग्य ' युजरनेम ' तपासून घ्यावे, लिंक अधिकृत आहे कि नाही आमच्या 'बायो चेक ऑफिशिअल्स' कडून तपासून घ्या, तुम्हाला एखाद्या लिंकवर संशय असेल तर त्याविषयी तक्रार दाखल करा, असे  UGC कडून सांगण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo