विकसित देशांनी अणुशक्ती विषयी जगात भिती निर्माण करून ठेवली : डॉ. अनिल काकोडकर

अणुशक्तीचा शोध लागला तेव्हा त्यांची ओळख विध्वंसक शक्ती म्हणून होती. मात्र, याचा उपयोग वीजनिर्मिती, शेती, कॅन्सरचा उपचार यांसारख्या लोकहीताच्या कामांसाठीही होत असतो.

विकसित देशांनी अणुशक्ती विषयी जगात भिती निर्माण करून ठेवली : डॉ. अनिल काकोडकर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अणुशक्तीमुळे (nuclear power) विकसित जग आणि विकसनशील-मागास जग अशी जगाची विभागणी झाली आहे.त्यामुळे जगात विषमता वाढली आहे. ही विषमता नष्ट करण्यासाठी देशातील नागरिकांचे राहणीमान सुधारण्याची गरज आहे.विकसित देशांनी (Developed countries)अणुशक्ती विषयी जगात भिती निर्माण करून ठेवली आहे.जगातील विषमता कमी करायची असेल तर सर्वांना समान उर्जा मिळणे गरजेचे (need to get equal energy) आहे. त्यासाठी जगाला अणुशक्ती शिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुऊर्जा शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर (Nuclear energy scientist Dr. Anil Kakodkar) यांनी केले.

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्रात 'क्लायमेट चेंज : ग्लोबल वॉर्मिंग' (एक आधुनिक दृक श्राव्य माध्यम) या प्रदर्शनाच्या व  डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सभागृहाच्या उद्धाटन प्रसंगी काकोडकर बोलत होते. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी , माजी कुलगुरू डॉ. नितिन करमरकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्राचे समन्वयक डॉ. राजेंद्र देवपूरकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा : उत्तरपत्रिकेत कामसूत्रच्या कथा आणि प्राध्यापकांना शिव्या ; विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, अणुशक्तीचा शोध लागला तेव्हा त्यांची ओळख विध्वंसक शक्ती म्हणून होती. मात्र, याचा उपयोग वीजनिर्मिती, शेती, कॅन्सरचा उपचार यांसारख्या लोकहीताच्या कामांसाठीही होत असतो.जगातील विषमता कमी कराण्यासाठी परदेशात उपलब्ध असलेली उर्जा आपल्याला मिळणे गरजेचे आहे. 
 कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्राच्या स्थापनेमागील संकल्पना समजावून सांगितली. यावेळी केंद्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे डॉ. काकोडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र देवपूरकर यांनी केले तर सुत्रसंचालन मृदृला कर्णी यांनी केले.

'क्लायमेट चेंज : ग्लोबल वॉर्मिंग' (एक आधुनिक दृक श्राव्य माध्यम) प्रदर्शन


लहान मुलांना ग्लोबल वॉर्मिंगविषयी माहिती मिळण्यासाठी, त्याबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्रात  'क्लायमेट चेंज : ग्लोबल वॉर्मिंग' (एक आधुनिक दृक श्राव्य माध्यम) हे कायमस्वरूपी प्रदर्शन उभारण्यात आले आहे. ७ प्रोजेक्टर असलेल्या सेमी सर्कुलर आकाराच्या खोलीतील हे प्रदर्शन ३ डीमध्ये आहे. ग्लोबल वार्मिगचा भविष्यात सुंदरबन, हिमालयन रेंज, इत्यादींवर कसा परिणाम होईल, हे याद्वारे दाखविण्यात आले आहे. याप्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर आतापर्यंत डिज्ने किंवा डिस्कवरीवर मनोरंजनासाठी करण्यात आला आहे. मात्र कदाचित पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक बाबींसाठी होत असल्याचे या प्रदर्शनाचे निर्माते विजेंद्र पाटील यांनी सांगितले.