प्रमोद चौगुले राज्यात दुसऱ्यांदा प्रथम ; राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर

प्रमोद चौगुले यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. चौगुले हे २०२० च्या परीक्षेतही प्रथम आले होते. त्यावेळी त्यांची निवड जिल्हा उद्योग अधिकारी या पदावर झाली होती.

प्रमोद चौगुले राज्यात दुसऱ्यांदा प्रथम ; राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा २०२१ च्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून प्रमोद चौगुले यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. तर सोनाली मात्रे यांनी राज्यात महिला उमेदवारमधून प्रथम क्रमांकाने यश मिळाले आहे.चौगुले हे २०२० च्या परीक्षेतही प्रथम आले होते. त्यावेळी त्यांची निवड जिल्हा उद्योग अधिकारी या पदावर झाली होती.

    एमपीएससी तर्फे ४०५ पदांसाठी ७ , ८ व ९ मे २०२० रोजी परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यात चौगुले यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.