'कोटा' पुन्हा हादरले.. NEET ची तयारी करणारी विद्यार्थ्यीनी बेपत्ता 

NEET ची तयारी करत असलेली कोचिंग विद्यार्थी गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहे.

'कोटा' पुन्हा हादरले..  NEET ची तयारी करणारी विद्यार्थ्यीनी बेपत्ता 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राजस्थानचे कोचिंग सिटी (Coaching City) म्हणून ओळखले जाणारे कोटा शहर पुन्हा एकदा बेपत्ता विद्यार्थ्यीनीमुळे (Missing students) हादरले आहे. कोटाच्या अनंतपुरा भागात राहणारी अंडर ग्रॅज्युएट मेडिकल प्रवेश परीक्षेची (NEET) तयारी करत असलेली विद्यार्थी गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता (Coaching student missing for last 8 days) आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र,अद्याप या विद्यार्थ्यीनीचा कोणताही सुगावा लागलेला नाही. 

उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे राहणारी ही विद्यार्थी गेल्या एक वर्षापासून कोटा येथे राहून NEET ची तयारी करत होती. तृप्ती सिंग वय २० वर्षे असे बेपत्ता झालेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती एप्रिल २०२३ मध्ये कोटा येथे आली होती. या विद्यार्थ्यीनीने नुकतीच भाड्याची खोली बदलून गोबरिया बावडी येथील पीजीमध्ये राहत असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी सकाळी 7:00 वाजता पीजीमधून परीक्षेसाठी निघाली होती. परंतु, ती परतलीच नाही. विद्यार्थी बेपत्ता होत असल्यामुळे घरमालक रुक्मिणीबाई यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले आणि विद्यार्थ्यीनीचे मित्र आणि कुटुंबीयांकडूनही माहिती गोळा केली.

अनंतपूर पोलिस स्टेशनचे अधिकारी भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, ती नुकतीच वृंदावनलाही गेली होती आणि काही दिवसांनी परतली होती. त्यामुळे तेथेही तपासासाठी पोलिसांचे पथक पाठवण्यात आले आहे. मात्र,  सर्व प्रयत्न करूनही विद्यार्थ्याचा कोणताही सुगावा लागलेला नाही. घरातील सदस्यांचीही चिंता वाढत आहे.

कोटामध्ये विद्यार्थी बेपत्ता होण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये कोटामधील विविध ठिकाणांहून विद्यार्थी बेपत्ता झाल्याच्या बातम्या येत होत्या. कोचिंगचे चार विद्यार्थी जानेवारीपासून बेपत्ता झाले आहेत.