विद्यार्थिनींनी तयार केला गणेश विसर्जन मिरवणुकीचा नकाशा; एकदा ठिकाणं पाहूनच बाहेर पडा...

पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते हा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मिरवणुकीच्या नियोजनामध्ये संपूर्ण पोलीस यंत्रणे करिता आता हा नकाशा वापरला जाणार आहे. 

विद्यार्थिनींनी तयार केला गणेश विसर्जन मिरवणुकीचा नकाशा; एकदा ठिकाणं पाहूनच बाहेर पडा...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

देशात आणि परदेशात पुण्यातील गणेश उत्सव प्रसिद्ध आहे. याच गणेशोत्सवाचा अंतिम टप्पा म्हणजे भव्य अशी गणेश विसर्जन मिरवणूक. पुणे शहर पोलीस या मिरवणुकीच्या विविध कामांच्या नियोजना करता गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग दर्शवणारा नकाशा वापरतात. सध्या हाताने रेखाटलेला नकाशा वापरण्यात येत होता तो बदलून नवा अधिकाधिक सुबक व वापरण्यासाठी सोपा  नकाशा असावा असा विचार घेऊन सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या विद्यार्थिनी खुशी सिद्धपुरा व सिद्धी देव यांनी अनेक पोलीस अधिकारी व पोलिसांशी चर्चा करून तसेच प्रत्यक्ष त्या मार्गाचा प्रवास करून नवा नकाशा तयार केला आहे.

 

पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते हा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मिरवणुकीच्या नियोजनामध्ये संपूर्ण पोलीस यंत्रणे करिता आता हा नकाशा वापरला जाणार आहे. पुणे शहर पोलीस वेबसाईट ट्विटर व इंस्टाग्राम या समाज माध्यमांवर सुद्धा हा नकाशा सर्वांसाठी उपलब्ध आहे व तो अतिशय सोपा व उपयुक्त आहे, अशी माहिती सिम्बायोसिस संस्थेकडून देण्यात आली.

डीईएस पुणे विद्यापीठ सुरू; विविध अभ्यासक्रमांमध्ये घेता येणार प्रवेश

 

हा उपक्रम करण्यासाठी महाविद्यालयातून डॉ. मनोहर देसाई व मयुरी डाबी यांनी विशेष मार्गदर्शन केले. हा उपक्रम सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या महाविद्यालयाच्या वतीने विशेष पुढाकार घेऊन करण्यात आला व त्याकरिता  महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. संजीवनी आयाचित यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

नकाशातील एकूण सुबक मांडणी रंगसंगती व महत्त्वाची ठिकाणे मिरवणूक मार्गाचे संपूर्ण दर्शन घडवतात. अशा प्रकारचा नकाशा तयार झाल्यामुळे येथून पुढे विविध नकाशांसाठी विद्यार्थ्यांची नक्कीच मदत घेतली जाईल, असे आयुक्तांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सुचवले. त्यामुळे आता गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी घराबाहेर पडताना हा नकाशा नक्कीच तुमची मदत करेल. नकाशामध्ये विसर्जन मिरवणुकीचे मार्ग, पार्किंग सुविधा, दवाखाने, विसर्जन घाट, पोलीस मदत केंद्र, रिक्षा स्टॅंड आदी माहिती नकाशामध्ये देण्यात आली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j