CUET UG 2024 : अर्जाची अंतिम मुदत पुन्हा वाढवली

उमेदवारांना आता CUET UG 2024 साठी अर्ज करण्यासाठी 5 एप्रिल (रात्री 9:50) पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

CUET UG 2024 : अर्जाची अंतिम मुदत पुन्हा वाढवली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET UG 2024) साठी नोंदणीची अंतिम मुदत पुन्हा वाढवली (Deadline increase) आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/CUET वर ऑनलाइन अर्ज भरू शकतात. सुधारित तारखेनुसार, विद्यार्थ्यांना आता CUET UG 2024 साठी अर्ज करण्यासाठी 5 एप्रिल (रात्री 9:50) पर्यंत मुदत देण्यात आली आहे. CUET UG अर्जाची मुदत वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. दुसऱ्या मुदतवाढीनुसार 31 मार्च ही अंतिम तारीख होती, परंतू उमेदवार आणि पालकांच्या मागणीनुसार पुन्हा एकदा तारीख वाढवण्यात आली आहे.

५ एप्रिल रोजी अर्ज विंडो बंद झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर प्रवेशपत्र जारी करण्यापूर्वी सीटी स्लिप सोडल्या जातील. CUET UG प्रवेशपत्रे मे 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात जारी केली जातील, असे सांगण्यात आले आहे. 

या वर्षी CUET UG फॉरमॅटमध्ये बदल झाला आहे. NTA ने दिलेल्या माहितीनुसार, CUET UG 2024 15 ते 31 मे दरम्यान 13 भाषांमध्ये हायब्रिड पद्धतीने आयोजित केले जाईल. गतवर्षीप्रमाणेच CUET ही परीक्षा आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, पंजाबी, ओडिया, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांमध्ये घेतली जाईल.

असा करा अर्ज 

सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम CUET च्या अधिकृत वेबसाईट cuetug.ntaonline.in ला भेट द्या. यानंतर होम पेजवर उपलब्ध असलेल्या CUET UG 2024 नोंदणी लिंकवर क्लिक करा. यानंतर आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि स्वतःची नोंदणी करा. अर्ज भरा आणि फी भरा. यानंतर सबमिट वर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करा.