महाज्योतीच्या निकालात गोंधळ; गुणपत्रिका संकेतस्थळावरून हटवली, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

निकालाबाबत महाज्योतीकडून खुलासा करण्यात आला आहे. तसेच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकाल योग्यच असल्याने गोंधळून न जाण्याचे आवाहन केले आहे.

महाज्योतीच्या निकालात गोंधळ; गुणपत्रिका संकेतस्थळावरून हटवली, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
Mahajyoti

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (Mahajyoti) MPSC (राज्यसेवा) प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या चाळणी परीक्षेचा निकाल शनिवारी संकेतस्थळावर (Website) प्रसिध्द करण्यात आला होता. मात्र, काही विद्यार्थ्यांना परीक्षेतील एकूण गुणांपेक्षा अधिक गुण तर काही विद्यार्थ्यांना (Students) नकारात्मक गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निकालातील या गोंधळामुळे अखेर महाज्योतीने संकेतस्थळावर गुणपत्रिका हटविली असून सुधारित निकाल (Result) जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

निकालाबाबत महाज्योतीकडून खुलासा करण्यात आला आहे. तसेच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकाल योग्यच असल्याने गोंधळून न जाण्याचे आवाहन केले आहे. दि.२५ व २६ ऑक्टोबर एकूण आठ शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आलेली होती. परीक्षेकरिता एकूण ३९ हजार ७८६ उमेदवार पात्र होते त्यातील १९ हजार १७३ उमेदवार हे परीक्षेकरिता हजर होते. महाज्योतीने परीक्षेच्या उत्तरपत्रिका प्रसिद्ध करून विद्यार्थ्याकडून आक्षेप मागविलेले होते. विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेले आक्षेप परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला पाठविण्यात आले व आवश्यकत्या सुधारणा करून अंतिम उत्तरपत्रिका तयार करण्यात आली.

SPPU News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची दिवाळीची सुट्टी जाहीर, सलग दहा दिवस विद्यापीठ बंद

 

एकूण ८ शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्याने गुणांचे Normalitation करण्यात आल्याचे परीक्षा एजन्सीने कळविलेले आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रेल्वे भरती बोर्डद्वारे वापरण्यात येणाऱ्या गुणांचे Nomaisation सूत्राचा वापर करण्यात आलेल्या एजन्सीने असे कळविल्याची माहिती महाज्योतीने दिली आहे. सर्व बाबींच्या स्पष्टीकरणासह परीक्षेतील बैठक क्रमांकानुसार निकाल दि.११ नोव्हेंबर रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेला होता. मात्र, काही विद्यार्थ्यांचे गुणांचे Normalisation हे २०० गुणांपेक्षा अधिक आल्याने व काही विद्यार्थ्यांचे नकारात्मक गुण आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

 

याबाबत परीक्षा घेणाऱ्या एजन्सीकडे चौकशी केली असता, परीक्षा एजन्सीने गुणांचे Normnalisation योग्य रीतीने केलेले आहे, असे सांगितले. या प्रक्रियेत गुणांचे Normalisation हे सरासरी तत्वावर होत असल्याने जितक्या गुणांची परीक्षा त्यापेक्षा अधिक जाऊ शकते व नकारात्मक देखील येऊ शकते. त्यामुळे परीक्षेचा निकाल हा योग्यच आहे असे परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेने स्पष्टीकरण सादर केले आहे. तरीही याबाबत कोणतीही शंका राहू नये म्हणून वेबसाईटवरून गुणपत्रिका हटविण्यात आलेली आहे, असे महाज्योतीने स्पष्ट केले आहे.

अतिरिक्त शुल्क आकारणीला चाप; व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शुल्क प्राधिकरणाकडून नियमावली

 

तज्ञांकडून नॉर्मलायझेशन फॉर्मुला बरोबर असल्याची खात्री करून घेऊन पुन:श्च निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत कोणतीही शंका मनात बाळगू नये, असे आवाहन महाज्योती मार्फत करण्यात येत आहे.  महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांच्या मनात शंका राहू नये यासाठी त्यांना परीक्षेत प्राप्त झालेले एकूण गुण व गुणांचे Normalisation केल्यानंतर येणारे गुण असे दोन्ही बाबी नमूद करून सुधारित निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे  महाज्योतीने संकेतस्थळावरून निकाल काढून टाकला म्हणून महाज्योतीच्या निकालात गोंधळ झाला असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही, असेही महाज्योतीने नमूद केले आहे.

 

विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमामुळे निकाल विद्यार्थ्यांना समजेल अश्या पद्धतीने लावण्यासाठी निकालाची शहानिशा तज्ञांकडून करून घेण्याचे कार्य प्रगती पथावर आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या परीक्षेत किती गुण प्राप्त झाले व गुणांचे Normalisation केल्यानंतर येणारे गुण प्राप्त होतात याची माहिती निकालाद्वारे देण्यात येणार आहे. सुधारित निकाल प्रसिद्ध करताना प्रारूप निकाल प्रसिद्ध करण्यात येईल, त्यावर विद्यार्थ्यांचे आक्षेप मागविण्यात येतील व संपूर्ण  प्रक्रिया पूर्ण करूनच अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निकालाबाबत मनात कोणतीही शंका मनात बाळगू नये, असे आवाहन महाज्योतीमार्फत करण्यात येत आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO