NTA ची वेबसाइट हॅक?; अधिकार्‍यांनी दिलं स्पष्टीकरण

एनटीएने आपली वेबसाइट आणि पोर्टल हॅक करण्याबाबत सुरू असलेल्या बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत.

NTA ची वेबसाइट हॅक?; अधिकार्‍यांनी दिलं स्पष्टीकरण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NTA कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये सातत्याने गैरप्रकार घडल्याचे उघड झाल्यानंतर आता NTA ची वेबसाइट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. मागील दोन दिवसांपासून अशा आशयाच्या बातम्या व्हायरल होत आहेत. या संदर्भात आता NTA कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

एनटीएने आपली वेबसाइट आणि पोर्टल हॅक करण्याबाबत सुरू असलेल्या बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. NTA अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, "NTA ची वेबसाइट आणि इतर सर्व वेब पोर्टल पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्या हॅक झाल्याच्या बातम्या खोट्या आहेत."

मीडिया रिपोर्टनुसार अधिकाऱ्यांनी सांगितले की, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ची वेबसाइट आणि इतर सर्व वेब पोर्टल पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यांचे हॅक झाल्याच्या बातम्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत. हे स्पष्टीकरण NEET-UG आणि UGC-NET सह स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेबद्दल सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान आले आहे. 

दरम्यान, शिक्षण मंत्रालयाने शनिवारी (दि.२२) एनटीएच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी, परीक्षा सुधारणांची शिफारस करण्यासाठी आणि डेटा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एक पॅनेल तयार करण्यात आले आहे. याप्रकरणी एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला असून तपास सुरू करण्यात आल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाचे म्हणणे आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयने विशेष पथके तयार केली आहेत. ही टीम बिहारमधील पाटणा आणि गुजरातमधील गोध्रा येथे पाठवली जात आहे.