'हिजाब बॅन' प्रकरणी मुंबई हायकोर्टाने विद्यार्थिनींची याचिका का फेटाळली

मुंबई हायकोर्टाने या विद्यार्थिनींची याचिका फेटाळली आहे.

'हिजाब बॅन' प्रकरणी मुंबई हायकोर्टाने विद्यार्थिनींची याचिका का फेटाळली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशासह राज्यात हिजाब बंदीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. मुंबई (MUMBAI) येथील चेंबूर, ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयामध्ये (N. G. Acharya and D. K. Marathe College) हिजाब बंदी (Hijab ban) घालण्यात आली. या निर्णयाविरोधात तसेच महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात (Against the college administration) ९ विद्यार्थीनींनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेत याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाने या विद्यार्थिनींची याचिका फेटाळली आहे.       

या याचिकेमध्ये हिजाबबंदी धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचा दावा विद्यार्थिनींनी केला होता. मात्र, याचिकेतील या आरोपांचं कॉलेजकडून हायकोर्टात खंडन करण्यात आले. कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा हेतू नसल्याचं कॉलेजने हायकोर्टात म्हटलं. या याचिकेवर सुनावणी करताना दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यावर हायकोर्टाने विद्यार्थिनींची ही याचिका फेटाळली. 

दरम्यान, हायकोर्टाने या विद्यार्थिनींची याचिका फेटाळल्यानंतर याचिकाकर्त्यांचे वकील अल्ताफ खान हे या संदर्भात याचिकाकर्त्यांसोबत बोलणार आहेत. त्यांनंतर सुप्रीम कोर्टात जायचं की नाही याचा विचार करणार आहेत. त्याचबरोबर, मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान द्यायला हवे, असे देखील खान यांनी म्हटले आहे.