धक्कादायक : शाळेचे फेक ॲप फॉलो केल्याने 108 विद्यार्थ्यांचे निलंबन; नामांकित शाळेची अजब कारवाई

पुण्यातील एका नामांकित शाळेतील सीबीएससीई बोर्डाच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील शाळेचे फेक अकाउंट फॉलो केले.

धक्कादायक : शाळेचे फेक ॲप फॉलो केल्याने 108 विद्यार्थ्यांचे निलंबन; नामांकित शाळेची अजब कारवाई

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यातील टिळक रस्त्यावरील (Tilak Road in Pune)एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या सीबीएसई बोर्डाच्या शाळेतील (CBSE Board School)इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी (Students of class IX)शाळेचे फेक फॉलो (Fake follow of the school)केले म्हणून तब्बल 108 विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याची धक्कादायक माहिती समोर आले आहे. कोणते ॲप खरे आणि कोणते खोटे याबाबत कोणाचाही गैरसमज होऊ शकतो, असे असताना शाळेने विद्यार्थ्यांवर कारवाई (School action against students)केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भल्या भल्या व्यक्तींची फसवणूक होत आहे. गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्ह्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शाळा किंवा इतर कोणत्याही संस्थांच्या नावे ॲप तयार करून फसवणुकीचे प्रकार होत आहेत. अशातच पुण्यातील एका नामांकित शाळेतील सीबीएससीई बोर्डाच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील शाळेचे फेक अकाउंट फॉलो केले. त्यामुळे त्यांच्यावर काही दिवस निलंबनाची कारवाई करण्यात आली. परिणामी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. 

निलंबनाची कारवाई झाल्याप्रकरणी विद्यार्थी व पालक शाळेविरोधात समोर येऊन बोलण्यास तयार नाहीत. मात्र, विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसताना शाळा प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई होणे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे,असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.तसेच शाळा प्रशासनांशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.