CBSC कडून आता सहावी, नववी आणि अकरावीला सुद्धा क्रेडिट सिस्टीम

विद्यार्थ्याला मिळणारे क्रेडिट्स शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जोडले जातील. विद्यार्थ्याला इयत्ता 9 वी साठी ऑफर केलेल्या संभाव्य क्रेडिटनुसार पाच विषय उत्तीर्ण करावे लागतील.

CBSC कडून आता सहावी, नववी आणि अकरावीला सुद्धा क्रेडिट सिस्टीम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क (National Credit Framework)अंतर्गत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ( CBSC ) शाळांमध्ये आणखीन एक महत्वपूर्ण बदल केला आहे. शैक्षणिक सत्र 2024-25 पासून इयत्ता 6 वी, 9 वी आणि 11 वी मध्ये क्रेडिट सिस्टीमद्वारे (credit system for 6th, 9th and 11th classes) शिक्षण दिले जाईल. क्रेडिट सिस्टीम ही प्रणाली पायलट प्रोजेक्ट (pilot project) म्हणून लागू करण्याची तयारी बोर्डाने केली आहे.
 या प्रणाली अंतर्गत, जर विद्यार्थ्यांनी इयत्ता 9 वी मध्ये वर्षातून 210 तास अभ्यास केला तर त्यांना 40-54 क्रेडिट गुण मिळतील. सर्व विषयांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच हे क्रेडिट दिले जाईल. यासाठी वर्षभर वर्गात ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असेल.

विद्यार्थ्याला मिळणारे क्रेडिट्स शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जोडले जातील. विद्यार्थ्याला इयत्ता 9 वी साठी ऑफर केलेल्या संभाव्य क्रेडिटनुसार पाच विषय उत्तीर्ण करावे लागतील. त्यात दोन भाषा आणि तीन विषयांचा समावेश असेल. उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना क्रेडिट मिळू शकेल. प्रत्येक विषयासाठी 210 तास असतील.अशा प्रकारे पाच अनिवार्य विषयांना १०५० तास दिले जातील. 150 तास अंतर्गत मूल्यांकन, शारीरिक शिक्षण, कला शिक्षण आणि कार्यानुभवासाठी असतील. प्रत्येक विषयासाठी सात क्रेडिट्स असतील. विद्यार्थ्याला इयत्ता नववीत पाच विषय उत्तीर्ण झाल्यावर ४० क्रेडिट मिळतील. जर विद्यार्थ्याने 6 वी आणि 7 वी विषय घेतला तर त्याचे क्रेडिट्स 47-54 असतील.

इयत्ता अकरावीमध्ये एक भाषा आणि चार विषय उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थी 40 क्रेडिट मिळण्यास पात्र असेल. प्रत्येक विषयासाठी 210 तास दिले जातील. इयत्ता नववीप्रमाणेच अंतर्गत मूल्यांकन, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव आणि सामान्य अभ्यासासाठी 150 तास असतील. जर एखाद्या विद्यार्थ्याने पाच विषयांव्यतिरिक्त सहावा विषय घेतला तर तो 47 क्रेडिट मिळण्यास पात्र असेल.