खरंच मेडिकल कॉलेजच्या जागा वाढल्या का ? NMC चे दिले स्पष्टीकरण 

मेडिकल कौन्सीलने नवीन वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता दिलेली नाही, तसेच विविध वैद्यकीय महाविद्यालयातील यूजी आणि पीजीच्या जागा वाढवलेल्या नाहीत.

खरंच मेडिकल कॉलेजच्या जागा वाढल्या का ? NMC चे दिले स्पष्टीकरण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नवीन वैद्यकीय महाविद्यालये बांधणे, नवीन वैद्यकीय महाविद्यालयाना मान्यता , एमबीबीएस (MBBS)म्हणजेच यूजी आणि पीजीच्या जागा वाढल्या,(UG and PG seats increase) अशा स्वरूपाची माहिती गेल्या काही दिवसांपसून सतत सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमांमधून समोर येत आहे.मात्र, नॅशनल मेडिकल कमिशनने (National Medical Commission- NMC) हे वृत्त फेटाळून लावले आहे.

NMC ने या संदर्भात प्रसिध्दीपत्रक प्रसिद्ध केले असून त्यात NMC ने म्हटले आहे की,  " मेडिकल कौन्सीलने नवीन वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता दिलेली नाही, तसेच विविध वैद्यकीय महाविद्यालयातील यूजी आणि पीजीच्या जागा वाढवलेल्या नाहीत.  शैक्षणिक सत्र 2024-25 साठी असा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही." तसेच 2024-25 या वर्षात 112 वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी आणि वैद्यकीय जागा वाढवण्यासाठी 58 अर्ज प्राप्त झाले होते. परंतु, त्यावर अद्याप काम झालेले नाही. एमबीबीएसच्या जागा वाढल्याच्या बातम्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येत असून त्या पूर्णपणे खोट्या असल्याचे कौन्सीलने म्हटले आहे.

येत्या शिक्षणिक वर्षांची वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जांची प्रक्रिया अद्याप सुरू असून, याबाबत कोणताही निर्णय झाल्यास त्याची माहिती सर्वप्रथम कौन्सीलच्या वेबसाइटवर अपलोड केली जाईल, असेही  कौन्सीलने म्हटले आहे.

-----------------------