CBSE बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आता 'इतके' गुण आवश्यक; बोर्डाने जाहीर केले उत्तीर्णतेचे निकष

सन 2025 मध्ये सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत सुमारे 44 लाख विद्यार्थी सहभागी होतील. या बोर्डाच्या परीक्षा देश-विदेशातील 8 हजार शाळांमध्ये घेतल्या जाणार आहेत. CBSE बोर्डाच्या इयत्ता 10वी, 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 1 जानेवारी 2025 पासून होणार आहेत.

CBSE बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आता 'इतके' गुण आवश्यक;  बोर्डाने जाहीर केले उत्तीर्णतेचे निकष

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Central Board of Secondary Education) CBSE आगामी वर्षाच्या बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहेत. CBSE बोर्ड इयत्ता 10वी, 12वीचा निकाल (10th and 12th Results) 2024 च्या घोषणेबरोबरच, बोर्डाने पुढील वर्षी होणाऱ्या CBSE बोर्ड परीक्षा 2025 चे उत्तीर्णतेचे निकष देखील जाहीर केले आहे. (The board has announced the pass criteria to be held next year)

CBSE बोर्ड इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2025 उत्तीर्ण होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना 33 टक्के गुणांची आवश्यकता असेल. CBSE बोर्डाच्या 10वी, 12वी लेखी परीक्षेत विद्यार्थ्यांना सर्व विषयांमध्ये किमान 33 टक्के गुण मिळवावे लागतील. प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यांकनात किमान 33% गुण मिळवावे लागतील. थोडक्यात, CBSE बोर्डाच्या कोणत्याही विषयात उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही विषयात एकूण 33% गुण मिळवावे लागतील. 
सन 2025 मध्ये सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत सुमारे 44 लाख विद्यार्थी सहभागी होतील. या बोर्डाच्या परीक्षा देश-विदेशातील 8 हजार शाळांमध्ये घेतल्या जाणार आहेत. CBSE बोर्डाच्या इयत्ता 10वी, 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 1 जानेवारी 2025 पासून होणार आहेत. तर CBSE बोर्डाच्या इयत्ता 10वी, 12 वीच्या थिअरी परीक्षा 15 फेब्रुवारी 2025 पासून घेण्यात येणार आहेत.