माझ्या भविष्यासाठी मतदान करा, विद्यार्थिनीने आई-वडीलांना लिहिलेले संदेश पत्र व्हायरल..

भावी मतदार असलेले विद्यार्थी राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणूकीत उत्साहाने सहभागी होताना दिसत आहेत. काही विद्यार्थ्यांकडून मतदान करावे म्हणून संदेश पत्र लिहिले जात आहेत. त्यातच आता एक पत्र सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

 माझ्या भविष्यासाठी मतदान करा, विद्यार्थिनीने आई-वडीलांना लिहिलेले संदेश पत्र व्हायरल..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भावी मतदार असलेले विद्यार्थी राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणूकीत (Maharashtra Assembly Elections) उत्साहाने सहभागी होताना दिसत आहेत. काही विद्यार्थ्यांकडून मतदान करावे म्हणून संदेश पत्र लिहिले जात आहेत. त्यातच आता एक पत्र सोशल मिडीयावर व्हायरल (Viral letter on social Media) होत आहे. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, म्हणून आई-बाबांकडे एकच मागणं दिवाळी सणाला, माझ्या भविष्यासाठी मतदान नक्की करायचं या निवडणुकीला, असे म्हणत एका विद्यार्थिनीने आई-वडीलांना संदेश पत्र लिहिले आहे. 

विद्यार्थिनीने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "प्रिय बाबा व आई मी आपली लाडकी लेक कल्याणी. माझ्या भविष्यासाठी किंवा लोकतंत्र मजबूत करण्यासाठी येत्या २० नोव्हेंबर या दिवशी विधानसभा निवडणूक येत आहे. या निवडणूकीला तुम्ही सुट्टी न समजता मतदान करावे. माझे भविष्य व देशाची प्रगती व्हावी, यासाठी मतदान करा, ही विनंती समजा किंवा हट्ट.. तुमची कल्याणी पवार, इयत्ता ६ वी..". 

सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केले जातात. लोकसभा निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. तरीही मतदानाचा टक्का ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गेला नव्हता. आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे. स्वीप कार्यक्रमांतर्गत यासाठी विविध कार्यालयांमध्ये उपक्रम राबविले जात आहेत, त्यात आता विद्यार्थ्यांचाही अर्थात भावी मतदारांचाही उपयोग निवडणूक आयोगाला होताना दिसत आहे.