दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी; ONGC अंतर्गत 2 हजार 236 पदांची भरती सुरू
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या एकूण 2 हजार 236 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Limited) अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या एकूण 2 हजार 236 रिक्त जागा (2 thousand 236 vacancies) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2024 (Last date 10 November 2024) आहे.
भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार अधिकृत संकेतस्थळ https://ongcindia.com/ वरून १० नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकतात. यामध्ये वेगवेगळ्या पदांनुसार वय मर्यादा, परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये भिन्नता असणार आहे. त्यानुसार १८ ते २४ वयोगटातील उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे. बीए/बी.कॉम/बीएससी/बीबीए/बीई/बीटेक १० वी/१२ वी आयटीआय ट्रेड असलेले उमेदवार सहभाग घेऊ शकतात.
जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. गुणांची संख्या समान असल्यास, अधिक वय असलेल्या व्यक्तीचा विचार केला जाईल. मूळ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
अप्रेंटिस श्रेणी नुसार स्टायपेंड निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस साठी 9 हजार रुपये प्रति महिना, तीन वर्षांचा डिप्लोमा असलेल्या उमेदवारांसाठी 8 हजार 50 रुपये प्रति महिना, ट्रेड अप्रेंटिस (10वी/12वी पास) असलेल्या उमेदवारांसाठी 7 हजार रुपये प्रति महिना तर ट्रेड अप्रेंटिस (आयटीआय 1 वर्ष कालावधी) उमेदवारांना 7 हजार 700 रुपये प्रति महिना, तसेच ट्रेड अप्रेंटिस (आयटीआय 2 वर्षे कालावधी) असलेल्या उमेदवारांसाठी 8 हजार 50 रुपये प्रति महिना स्टायपेंड देण्यात येणार आहे.