CBSE च्या प्रश्नपत्रिकेत चुका अन् अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांसाठी नव्या पद्धतीचा अवलंब

सध्या CBSE बोर्डाच्या 10वी आणि  12वी बोर्डाची परीक्षा सुरु आहे, या पार्शवभूमीवर हा महत्वाचा निर्णय ठरेल.

CBSE च्या प्रश्नपत्रिकेत चुका अन्  अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांसाठी नव्या पद्धतीचा अवलंब

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेत चुकीचा किंवा अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारण्यात आला तर काय करावे? त्याबाबत CBSE ने नवीन प्रोटोकाॅल (New protocol) जारी केले आहेत. प्रश्नपत्रिकेत कोणताही चुकीचा (Wrong question) किंवा अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न  (Extracurricular Questions) किंवा इतर कोणतीही चूक आढळल्यास (If any other error is found) सर्वप्रथम वर्गात उपस्थित निरीक्षकांना कळवावे. त्यानंतर तुमची शंका पर्यवेक्षकाकडून मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल. तफावत लक्षात घेऊन बोर्ड नवीन मार्किंग स्कीम (New Marking Scheme) करेल. नवीन प्रोटोकॉलनुसार मार्किंग योजना इयत्ता 10वी आणि 12वीच्या शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार केली जाईल.

पुढे शिक्षकांनी प्रश्नपत्रिका पुनर्विलोकन अहवाल तयात करून बोर्डाला पाठवणे अपेक्षित आहे. हा अहवाल परीक्षेच्या दिवशीच तयार करून बोर्डाकडे पाठवावा लागेल. या अहवालात परीक्षेची काठीण्य पातळी, पेपरमध्ये चुका होत्या की नाही, छपाईच्या गुणवत्तेचा तपशील आणि विचारलेले प्रश्न अभ्यासक्रमावर आधारित होते की नाही, याचा समावेश असावा, असे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या CBSE बोर्ड परीक्षा 2024 च्या प्रश्नपत्रिकेत काही चूक आढळल्यास त्यांनी वरील प्रक्रियेचे पालन करावे.

 प्रश्नपत्रिकेत चुकीचा किंवा अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारला गेल्याची तक्रार विद्यार्थी नेहमीच करताना दिसतात. त्यातही जर बोर्डाच्या परीक्षेत ही समस्या उद्भवली तर विद्यार्थी आणखीनच तणावात येतात, अशा परिस्थित काय करावे हे सांगणारे नवीन प्रोटोकॉल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) ने तयार केले ते विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. परीक्षेच्या पेपरमध्ये चुकीचा किंवा अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न सापडल्यानंतर विद्यार्थी त्यावर उपाय करू शकतात. सध्या CBSE बोर्डाच्या 10वी आणि  12वी बोर्डाची परीक्षा सुरु आहे, या पार्शवभूमीवर हा महत्वाचा निर्णय ठरेल.