ICSE, ISC पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १२ जुलैला पहिला पेपर
दहावीची परीक्षेचे पेपर सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान एकाच शिफ्टमध्ये घेतले जातील. मात्र, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ मिळणार आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) ने इयत्ता दहावी (ICSE) व बारावीच्या (ISC) पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक (10th Examination) जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार, दोन्ही परीक्षा १२ जुलैपासून सुरू होणार आहेत. तर दहावीची परीक्षा १९ जुलैपर्यंत आणि बारावीची (12th Examination) दोन दिवस चालणार आहे.
दहावीची परीक्षेचे पेपर सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान एकाच शिफ्टमध्ये घेतले जातील. मात्र, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ मिळणार आहे. तर बारावीची परीक्षा १२ आणि १३ जुलै रोजी होणार आहेत. ही परीक्षा दुपारी २ ते ५ दरम्यान घेतली जाईल. दहावीच्या परीक्षेप्रमाणेच १२ वी ची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे.
CBSE Board Exam : पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर, १७ जुलैपासून सुरूवात
प्रवेशपत्राची प्रिंटआउट परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाणे बंधनकारक आहे. कोणत्याही विद्यार्थ्याने प्रवेशपत्र न बाळगल्यास, त्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही, अशी सूचना CISCE कडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना www.cisce.org या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेविषयी अधिक माहिती मिळेल.
असे करा वेळापत्रक डाउनलोड -
* CISCE-cisce.org च्या अधिकृत वेबसाइटवर जा
* मुख्यपृष्ठावर, ICSE, ISC कंपार्टमेंट परीक्षा 2023 वेळापत्रक लिंकवर क्लिक करा
* एक नवीन PDF फाइल उघडेल जिथे तारखा नमूद केलेल्या असतील
* तारखांवर जाऊन PDF डाउनलोड करा
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.