CBSE कडून दहावी, बारावीच्या निकालच्या तारखेची घोषणा; या तारखेनंतर लागणार निकाल 

निकालाच्या संभाव्य तारखेची घोषणा करत CBSE बोर्डाने आपल्या अधिकृत वेबसाईट वर म्हटले आहे की, ' 10वी आणि 12वीचे निकाल 20 मे नंतर जाहीर केले जाऊ शकतात.'

CBSE कडून दहावी, बारावीच्या निकालच्या तारखेची घोषणा; या तारखेनंतर लागणार निकाल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशातील लाखो विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Central Board of Secondary Education- CBSE) इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखेची (10th and 12th result date)घोषणा बोर्डाकडून करण्यात आली आहे. निकालाच्या संभाव्य तारखेची घोषणा करत CBSE बोर्डाने आपल्या अधिकृत वेबसाईट वर म्हटले आहे की, ' 10वी आणि 12वीचे निकाल 20 मे नंतर जाहीर केले जाऊ शकतात.'

CBSE बोर्डाची परीक्षा दिलेले सुमारे 39 लाख विद्यार्थी सध्या त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. एकदा निकाल घोषित झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे त्यांचे निकाल तपासू शकतात. CBSE बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 02 एप्रिल 2024 या कालावधीत आणि दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च 2024 या कालावधीत झाल्या. 

दरम्यान, शुक्रवारी (दि.3 ) CBSE बोर्डाचे 10वी आणि 12वीचे निकाल  जाहीर होईल, अशा बातम्या सकाळपासून वायरल होत होत्या. अशातच बोर्डाचे  संकेतस्थळ  काही काळासाठी बंद पडल्यामुळें गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, काही वेळानंतर वेबसाईटवर परीक्षेचे निकाल 20 मे नंतर जाहीर होतील, अशी सूचना प्रसिध्द करण्यात आली.