पाचवी, आठवीचे विद्यार्थी पहिल्यांदा झाले नापास ; शहरापेक्षा गावातले पोरं हूशार..

शहरी भागातील विद्यार्थ्यांचे नापास होण्याचे प्रमाण ५ टक्के असून ग्रामीण भागात हेकच प्रमाण ३ ते ४ टक्के आहे.

पाचवी, आठवीचे विद्यार्थी पहिल्यांदा झाले नापास ;  शहरापेक्षा गावातले पोरं हूशार..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शहरातील विद्यार्थ्यांना असणाऱ्या शैक्षणिक सुविधांच्या तुलनेत ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा कमी आहेत.मात्र,असे असले तरी शहरी शाळांमधील विद्यार्थ्यांपेक्षा (Students in urban schools)ग्रामीण भागातील विद्यार्थी (Students from rural areas)शैक्षणिक गुणवत्तेचा विचार केला तर शहरी विद्यार्थ्यांपेक्षा हुशार (Smarter than urban students)असल्याचे समोर आले आहे.यंदा इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा (Examination of class 5 th and 8 th students)घेण्यात आली.त्यात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांच्या तुलनेत शहरी विद्यार्थी अधिक असल्याचे मुख्याध्यापक संघाने (Principals Association)केलेल्या पहाणीतून दिसून आले. 

राज्य शासनाने शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करता येत नव्हते. त्यामुळे सुमारे 10 ते 12 वर्षांपासून विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत आणि आठवीतून नववीपर्यंतच्या वर्गात पुढे पाठवले जात होते.मात्र , चालू शैक्षणिक वर्षात आरटीई कायद्यात बदल झाल्यामुळे यंदा प्रथमच विद्यार्थी नापास झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांमधील अभ्यासात मागे असलेले इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थी नापास झाले. मुख्याध्यापक संघाने केलेल्या पहाणीनुसार शहरी भागातील विद्यार्थ्यांचे नापास होण्याचे प्रमाण ५ टक्के असून ग्रामीण भागात हेकच प्रमाण ३ ते ४ टक्के आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत अभ्यासात काही प्रमाणात पुढे असल्याचे दिसून आले.

शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन या विद्यार्थ्यांचा निकाल विशिष्ट पध्दतीने जाहीर करण्यात आला. एखाद्या विषयात विद्यार्थ्याला कमी गुण असतील तर त्याला ग्रेस गुणांची सवलत देण्याचा पर्याय सुध्दा आमलात आणला गेला.मात्र, तरीही काही विद्यार्थी नापास झाल्याचे दिसून आले. 

--------------------------------------------

पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्यानंतर जाहीर झालेल्या निकालाबाबत पुणे जिल्ह्यातील 300 शाळांचा मुख्याध्यापक संघातर्फे रिव्हू घेण्यात आला.त्यात शहरी भागातील 5 टक्के तर ग्रामीण भागातील 3 ते 4 टक्के नापास झाल्याचे दिसून आले.त्यामुळे शहरी भागापेक्षा गाव-खेड्यातील विद्यार्थी काही प्रमाणात हुशार असल्याचे  म्हणता येईल. 
- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ
-------------------------------