तलाठी भरतीच्या जिल्हा निहाय निवड याद्या व प्रतिक्षा याद्या प्रसिद्ध

शासनातर्फे https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/SelectionList या लिंकवर निवड यादी प्रसिद्ध केली आहे. 

तलाठी भरतीच्या जिल्हा निहाय निवड याद्या व प्रतिक्षा याद्या प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील बहुचर्चित तलाठी भरतीचा (talathi bharti ) निकाल जाहीर झाला असून 23 जिल्ह्यांची जिल्हा निहाय निवड यादी व प्रतिक्षा याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पेसा क्षेत्र सोडून सर्व तलाठी सरळ सेवा भरती 2023 ची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.

तलाठी भरती प्रक्रियेत पेपर फुटीच्या घटना घडल्यामुळे भरती प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी एकीकडे केली जात असताना प्रामाणिकपणे परीक्षा दिलेल्या उमेदवारांवर अन्याय होऊ नये म्हणून पात्र उमेदवारांच्या निवड याद्याजाहीर कराव्यात,अशी मागणी उमेदवारांकडून केली जात होती. त्यानुसार शासनातर्फे https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/SelectionList या लिंकवर निवड यादी प्रसिद्ध केली आहे. 

अकोला, मुंबई, वाशिम, जालना, कोल्हापूर ,मुंबई उपनगर, सातारा ,बीड, नागपूर ,रत्नागिरी, सांगली ,धाराशिव, परभणी, लातूर, सिंधुदुर्ग, गोंदिया, बुलढाणा, वर्धा, सोलापूर, रायगड, भंडारा, छत्रपती संभाजीनगर ,हिंगोली या जिल्ह्यांच्या निवड याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.