ऑल इंडिया बार एक्झामिनेशनचे  (AIBE 18)  हॉल तिकीट उपलब्ध 

परीक्षेला बसलेले उमेदवार AIBE च्या अधिकृत वेबसाइट, allindiabarexanation.com वर जाऊन त्यांचे हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना एआयबीई नोंदणी आयडी आणि पासवर्डने लॉग इन करावे लागेल.

ऑल इंडिया बार एक्झामिनेशनचे  (AIBE 18)  हॉल तिकीट उपलब्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

बार कौन्सिल ऑफ इंडियाने (Bar Council of India-BCI) येत्या येत्या १० डिसेंबर  रोजी होणाऱ्या ऑल इंडिया बार एक्झामिनेशनचे  (AIBE 18)  हॉल तिकीट (hall ticket) उपलब्ध करून दिले आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार AIBE च्या अधिकृत वेबसाइट allindiabarexanation.com वर जाऊन त्यांचे हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना एआयबीई नोंदणी आयडी आणि पासवर्डने लॉग इन करावे लागेल.

१८ वी ऑल इंडिया बार परीक्षा पेन आणि पेपरवर आधारित ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भारतात कायद्याचा सराव करण्याची परवानगी दिली जाईल. ही एक पात्रता परीक्षा आहे, याचा अर्थ उमेदवारांना किमान उत्तीर्ण गुण मिळवून परीक्षेत पात्र व्हावे लागेल. परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना सरावाचे प्रमाणपत्र (COP) दिले जाते. जे भारतात कायद्याचा सराव करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र आहे.

हेही वाचा : बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरू ; २१०० पदांसाठी भरती

असे करा प्रवेशपत्र डाउनलोड 

* सर्वप्रथम AIBE 18 allindiabarexanation.com च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

* AIBE 18 प्रवेशपत्र डाउनलोड लिंकवर क्लिक करा.

* तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून AIBE १८ च्या हॉल तिकीट पोर्टलवर लॉग इन करा.

* लॉगिन केल्यानंतर AIBE हॉल तिकीट 2023 स्क्रीनवर दिसेल.

* हॉल तिकीटवर दिलेले सर्व तपशील काळजीपूर्वक वाचा.

* परीक्षेच्या दिवशी वापरण्यासाठी AIBE 18 प्रवेशपत्राच्या  प्रती डाउनलोड करा आणि प्रिंट आऊट घ्या.