मोठी बातमी : एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्या; सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024, या परीक्षांचा समावेश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे संयुक्त पूर्व परीक्षा 2024 सह 19 मे रोजी होणारे समाज कल्याण अधिकारी गट- ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या सरळ सेवा चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मोठी बातमी : एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्या; सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024, या परीक्षांचा समावेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission) येत्या 28  एप्रिल रोजी घेतली जाणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 (Civil Services Combined Pre Exam 2024) पुढे ढकलण्यात आली आहे.सध्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली (postponed the exam)असून परीक्षेची तारीख यथावकाश जाहीर केली जाईल, असे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपल्या परीक्षा पुढे ढकलल्याचे नुकतेच जाहीर केले होते. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा सुद्धा पुढे ढकलल्या जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा आयोगातर्फे करण्यात आली नव्हती.परंतु, आयोगाने आरक्षणाचे कारण देत परीक्षा पुढे ढकल्याचे जाहीर केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे संयुक्त पूर्व परीक्षा 2024 सह 19 मे रोजी होणारे समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या सरळ सेवा चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गांकरिता अधिनियम 2024 मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चित प्राप्त झाल्यानंतर वरील परीक्षाबाबत घोषणा केली जाणार असल्याचे आयोगातर्फे परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.