UPSC निकाल 2023 : नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर 

परीक्षेत बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात.

UPSC निकाल 2023 : नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षेचा (Civil Service Main Service) निकाल जाहीर (Results announced) केला आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. UPSC मुख्य परीक्षेत एकूण १४ हजाराहून अधिक उमेदवार बसले होते. यामुळे अनेक उमेदवारांना आपले स्वप्न पुर्ण करता येणार आहेत. 

UPSC द्वारे आयोजित नागरी सेवांची मुख्य परीक्षा 15 ते 24 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते 12 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 2 ते 5 अशी होती. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले १४ हजारांहून अधिक उमेदवार यात सहभागी झाले होते.

अधिकृत माहितीनुसार, अंतिम निकाल जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत सर्व उमेदवारांच्या गुणपत्रिका आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केल्या जातील. व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) आयोजित केल्यानंतर आणि 30 दिवसांच्या कालावधीसाठी ते वेबसाइटवर उपलब्ध होईल.

फॉर्म-2 (DAF-II) भरणे आवश्यक 

9 डिसेंबरपासून ते UPSC @ upsc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर फॉर्म-2 DAF-II उपलब्ध करून दिले जाईल. "व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) मध्ये यशस्वी झालेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे तपशीलवार अर्ज भरणे आणि सबमिट करणे आवश्यक आहे," असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

असा तपासा निकाल
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा. यानंतर होम पेजवर रिझल्ट लिंकवर क्लिक करा. आता तुमच्यासमोर पीडीएफ स्वरूपात एक नवीन पेज उघडेल. तुमचा रोल नंबर PDF मध्ये शोधा. पीडीएफ डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या.