खोटे दिव्यांग प्रमाणपत्र काढून नोकरीला लागणाऱ्यांना थांबवा.. बच्चू कडू यांना साकडे

दिव्यांग उमेदवारांच्या वतीने स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांनी दिव्यांगाचे नेते समजले जाणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्याकडे केली आहे. 

खोटे दिव्यांग प्रमाणपत्र काढून नोकरीला लागणाऱ्यांना थांबवा.. बच्चू कडू यांना साकडे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

बरेच उमेदवार खोट दिव्यागांचे प्रमाणपत्र (Fake disability certificate) काढून नोकरीस लागले असून यापुढे देखील अशाच पद्धतीने नोकरी मिळवण्याचा काही स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांचा (Competitive Exam Candidates) हेतू आहे. आम्ही याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करत आहोत आपण ही करावा आणि आम्हाला न्या मिळवून द्यावा, अशी मागणी दिव्यांग उमेदवारांच्या वतीने स्पर्धा परीक्षा समन्वय समिती (Competitive Examination Coordination Committee) महाराष्ट्र राज्य यांनी दिव्यांगाचे नेते समजले जाणाऱ्या आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांच्याकडे करण्यात आली आहे. 

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटले आहे की,  बच्चू कडू साहेब आपण दिव्यांगांसाठी खूप चांगले काम करतात.  हे पूर्ण महाराष्ट्रला माहित आहे. सध्या सरळसेवेच्या विविध पदांच्या बऱ्याच परीक्षा झाल्या आहेत. काही प्रोसेसमध्ये आहे तर काही ठिकाणी नियुक्त्या मिळाल्या आहेत. आम्हाला बऱ्याच दिव्यांग बांधवानचे एसएमएस तसेच कॉल आले आहेत की बरेच उमेदवार खोट दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढून नोकरीस लागलेले आहेत,  तसेच लागणार आहेत. 

आम्ही याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला आहे आणि करत आहोत, आपणही याबाबत पाठपुरावा करावा आणि यांना न्याय मिळवून द्यावा. बऱ्याच विभागाच्या परीक्षा झाल्या आहेत. सर्व विभागात बोगस उमेदवार भरले आहेत. जळगाव, वर्धा, भंडारा, बुलढाणा आणि इतर जिल्ह्यातून खोटे प्रमाणपत्र काढले आहेत, असे समजले आहे.  याबाबत आपण पाठपुरावा करावा, अशी विनंती समन्वय समितीने बच्चु कडू यांच्याकडे एक्स या समाज माध्यमावर पोस्ट टाकून केली आहे.