मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका बारा हजार रुपयात.. विद्यापीठाची पोलिसांकडे तक्रार

जाहिरात पाहून पुणे येथील एका व्यक्तीने त्या मजकुराखाली दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने 2 हजार रुपये पाठविल्यानंतर त्या व्यक्तीच्या व्हॉटसॲपवर मुंबई विद्यापीठाची ‘बी.एस्सी’ अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्राची कथित बनावट गुणपत्रिका आली.

मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका बारा हजार रुपयात.. विद्यापीठाची पोलिसांकडे तक्रार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सतत चर्चेत असणारे मुंबई विद्यापीठ (Mumbai University) सध्या वेगळ्याच कारणासाठी वादात सापडले आहे. मुंबई विद्यापीठाची गुणपत्रिका अवघ्या दहा ते बारा हजार रुपयांत (Mark sheet for ten to twelve thousand rupees)मिळत असल्याची जाहिरात समाजमाध्यमावर प्रसिद्ध (Advertised on social media)झाल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या कथित बनावट गुणपत्रिकेबाबत (Fake Mark Sheet)मुंबई विद्यापीठ प्रशासनाने वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) पोलीस ठाण्यात (BKC Police Station)लेखी तक्रार दाखल केली आहे.  

 विद्यापीठाने आपल्या लेखी तक्रार अर्जात म्हटले आहे की,  ‘बनावट गुणपत्रिकेचे प्रकरण हे समाजाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक करणारे आहे. यामुळे  विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे. तरी या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जेणेकरून अशा प्रकारच्या बाबींना आळा बसण्यास मदत होईल.'  

 काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाची गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र घरबसल्या फक्त एका दिवसांत 10 ते 12 हजार रुपयांत मिळवा, अशी जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.  ही जाहिरात पाहून पुणे येथील एका व्यक्तीने त्या मजकुराखाली दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा गुणपत्रिका विकणाऱ्यांनी 2 हजार रुपये आगाऊ रक्कम पाठवण्यास सांगितले. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने 2 हजार रुपये पाठविल्यानंतर त्या व्यक्तीच्या व्हॉटसॲपवर मुंबई विद्यापीठाची ‘बी.एस्सी’ अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्राची कथित बनावट गुणपत्रिका आली. त्यानंतर हे प्रकरण उघड झाले. ही गुणपत्रिका बनावट असल्याचे सिद्ध झाले.

  दरम्यान, बीएससीच्या सहाव्या सत्राची  ही गुणपत्रिका 6 एप्रिल 2024 या तारखेची असून, ती फोटोशॉप आणि इतर संगणकीय तंत्रांच्या मदतीने तयार करण्यात आल्याचा खुलासा विद्यापीठाकडून करण्यात आला. याशिवाय अशा प्रकारची पदवी आणि गुणपत्रिका देणाऱ्या तोतयांपासून सावध राहत कोणत्याही प्रलोभननांना बळी न पडण्याचं आवाहन मुंबई विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------