रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा

स्वायत्त दर्जा कॉलेजला परीक्षा आयोजित करण्यास, विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यास आणि स्वतंत्रपणे पदवी प्रदान करण्यास सक्षम करेल.

रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा
G H Raisoni College

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट (G. H. Raisoni College) या पुण्यातील शैक्षणिक संस्थेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्रदान केला आहे. महाविद्यालयाला त्यांच्या शैक्षणिक कार्यक्रम, विद्याशाखा, पायाभूत सुविधा आणि प्रशासन संरचना यांचे मूल्यमापन केल्यानंतर अधिकार प्राप्त स्वायत्त दर्जा प्रदान केला आहे. 

एक सशक्त स्वायत्त संस्था म्हणून, जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटला आता उद्योगाच्या मागण्या आणि तांत्रिक प्रगती यांच्याशी जुळवून घेण्यासाठी अभ्यासक्रमांची रचना आणि सुधारणा करण्याचे अधिकार असतील. स्वायत्त दर्जा कॉलेजला परीक्षा आयोजित करण्यास, विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यास आणि स्वतंत्रपणे पदवी प्रदान करण्यास सक्षम करेल.

कृषी प्रवेशात संभ्रम; पहिली निवड यादी जाहीर, तरीही नव्या बदलांबाबत अनिश्चितता

या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल बोलताना, जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे कॅम्पसचे संचालक डॉ. रवींद्र खराडकर यांनी सांगितले की,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सक्षम स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाल्याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. ही मान्यता उच्च गुणवत्तेचे शिक्षण प्रदान करण्यासाठी आणि भविष्यातील नेतृत्व घडविण्यासाठी महत्वाचे आहे. या नवीन स्वायत्ततेसह, आम्ही उद्योगाच्या विकसित गरजा पूर्ण करण्यासाठी आमचे कार्यक्रम नवनवीन आणि अनुकूल करणार आहोत. ज्यामुळे आमचे विद्यार्थी यशस्वी करिअरसाठी चांगल्या प्रकारे तयार होतील." 

स्वायत्त दर्जा मिळाल्याबद्दल जी एच रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी, जी एच रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे कार्यकारी संचालक  श्रेयश रायसोनी यांनी अभिनंदन केले.   

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD