विद्यापीठाशी संलग्न तब्बल 125 महाविद्यालयांना लागणार टाळे? 

येत्या शैक्षणिक वर्षात तब्बल 125 महाविद्यालयांना टाळे लागण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाशी संलग्न तब्बल 125 महाविद्यालयांना लागणार टाळे? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्न सुमारे 100 ते 125 महाविद्यालयांनी विद्यापीठ संलग्नता (Colleges affiliated to the University) शुल्क भरलेले नाही.तसेच या महाविद्यालयांमध्ये अनेक शैक्षणिक त्रुटी आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून ही महाविद्यालये बंद (Colleges closed)करण्याबाबत पाऊले उचलली जात आहेत.परिणामी येत्या शैक्षणिक वर्षात तब्बल 125 महाविद्यालयांना टाळे लागण्याची शक्यता आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या 783 असून त्यात पुणे जिल्ह्यात 453 अहमदनगर जिल्ह्यात 149 नाशिक व दादरा नगर हवेली मधील 181 महाविद्यालयांचा समावेश आहे.केवळ मुलींच्या महाविद्यालयांची संख्या 24 असून मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटची संख्या 178 आहे.त्यात पुण्यात 129 , अहमदनगरमध्ये 22 आणि नाशिकमध्ये 27 इन्स्टिट्यूटचा समावेश आहे.तसेच एकूण रिसर्च इन्स्टिट्यूटची संख्या 73 असून नाईट कॉलेजची संख्या 18 आहे.संलग्न महाविद्यालयांमध्ये सुमारे 7 लाख 9 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.

हेही वाचा : अस्मा इन्स्टिटयूटला विद्यापीठाची नोटीस;एमबीएच्या विद्यार्थ्यांना लुटले,गुन्हा दाखल

राज्यातील सर्व राज्य विद्यापीठांचा विचार करता पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या सर्वाधिक आहे.मात्र,गेल्या काही वर्षात 45 हून धिक महाविद्यालये स्वायत्त झाली आहेत.मात्र,अशी काही महाविद्यालये आहेत की ज्यांनी विद्यापीठाकडे संलग्नता शुल्कच भरलेले नाही.तसेच संलग्नतेशी संबंधित काही त्रुटी आहेत.त्यामुळे विद्यापीठाने ही महाविद्यालये बंद करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सेट परीक्षा अपडेट : लोकसभा निवडणुकांमुळे सेट परीक्षेत बदल होणार का ? केव्हा मिळणार हॉल तिकीट

दारम्यान, विद्यापीठाशी संलग्न काही स्वायत्त महाविद्यालयांनी विद्यापीठाचे कोट्यवधी रुपयांचे शुल्क थकवले आहे. त्यामुळे या महाविद्यालयांबाबत उचित कार्यवाही करून थकवलेले शुल्क जमा करून घ्यावे,असा ठराव काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत करण्यात आला होता.