विज्ञान, वाणिज्यपेक्षा कला शाखेचा कटऑफ सर्वाधिक; महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये घसरण
फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये कला शाखेचा इंग्रजी माध्यमाचा अनुदानित तुकडीचा कटऑफ सर्वाधिक ४८२ एवढा आहे. विशेष म्हणजे विज्ञान शाखेचा अनदानित तुकडीचा कटऑफ सात गुणांनी कमी आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
इयत्ता अकरावीची (11th Admission Process) पहिल्या नियमित प्रवेश फेरीची निवड यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये बहुतेक महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये (College CutOff) यंदा घसरण झाल्याचे चित्र आहे. यावर्षी दहावीचा एकूण निकाल (SSC Result) आणि विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांमध्येही घसरण झाल्याने कटऑफ कमी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यातही कला शाखेचा कटऑफ टिकून असून यंदा टॉप कॉलेजमध्ये (Top Colleges in Pune) कला शाखा इंग्रजीतून शिकण्याकडे गुणवंत विद्यार्थ्यांचा कल असल्याचे आढळून आले आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये कला शाखेचा इंग्रजी माध्यमाचा अनुदानित तुकडीचा कटऑफ सर्वाधिक ४८२ एवढा आहे. विशेष म्हणजे विज्ञान शाखेचा अनदानित तुकडीचा कटऑफ सात गुणांनी कमी आहे. इतर प्रमुख महाविद्यालयांमध्ये कोणत्याही शाखेचा कटऑफ ४८२ किंवा त्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळे कला इंग्रजी शाखा कटऑफमध्ये टॉपवर आहे. या महाविद्यालयाच्या कटऑफमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत फारसा फरक पडलेला दिसत नाही.
शाळेच्या आवारात तंबाखू सेवन, मद्यप्राशन करणे पडणार महागात; शिक्षणमंत्री केसरकरांनी काढला जीआर
स.प. महाविद्यालयाचा कटऑफ मात्र काही प्रमाणात खाली आला आहे. कला शाखेचा मराठी माध्यमाचा १५ गुणांनी तर इग्रजीचा सहा गुणांनी कमी झाला असून वाणिज्य आठ गुणांनी घसरला आहे. विज्ञानचा अनुदानित आणि विनानुदानितचा कटऑफ पाच गुणांनी कमी झाला आहे. बृहनमहाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे अनुदानितचे कटऑफ चार गुणांनी तर विनानुदानितचे कटऑफ पाच गुणांनी कमी झाले आहे.
शहरांतील काही महाविद्यालयांचे कटऑफ पुढीलप्रमाणे -
स. प. महाविद्यालयाचा कटऑफ (कंसात २०२२-२३ मधील कटऑफ)
कला – मराठी अनुदानित – ३५८ (३७३), इंग्रजी अनुदानित ४६१ (४६७)
वाणिज्य – इंग्रजी अनुदानित – ४४० (४४८)
विज्ञान – अनुदानित – ४५९ (४६४), विनानुदानित – ४४९ (४५४)
फर्ग्युसन महाविद्यालयाचा कटऑफ
कला – मराठी अनुदानित – ४२९ (४२४), इंग्रजी अनुदानित – ४८२ (४८२), इंग्रजी विनानुदानित – ४६६ (४६६)
विज्ञान – अनुदानित – ४७५ (४७६), विनानुदानित – ४७३ (४७४)
आरटीईच्या 'त्या' विद्यार्थ्यांचे शुल्क राज्य शासनाने द्यावे : धर्मेंद्र प्रधान
बृहनमहाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय
वाणिज्य – अनुदानित इंग्रजी – ४७१ (४७५), विनानुदानित इंग्रजी ४६६ (४७१)
वाडिया वाणिज्य महाविद्यालय
अनुदानित मराठी – ३१६, अनुदानित इंग्रजी - ४१३,
सिम्बायोसिस महाविद्यालय (कंसात २०२२-२३)
कला – अनुदानित इंग्रजी – ४६८ (४६६)
वाणिज्य – अनुदानित इंग्रजी – ४५३ (४५५)
लक्ष्मणराव आपटे विद्यालय (कंसात २०२२-२३)
वाणिज्य – विनानुदानित इंग्रजी – ४०१ (४०१)
विज्ञान – अनुदानित – ४७३ (४७४), विनानुदानित – ४४८ (४५२)
आबासाहेब गरवारे महाविद्यालय (२०२३-२४)
विज्ञान – अनुदानित – ४४८
वाणिज्य – अनुदानित इंग्रजी - ४५१
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
eduvarta@gmail.com