CTET परीक्षा 8 फेब्रुवारीला; CBSE कडून अधिकृत नोटीस जाहीर 

सीटीईटी संदर्भातील अधिकृत माहिती https://ctet.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे. परीक्षा, अभ्यासक्रम, भाषा, पात्रता, परीक्षा शुल्क, परीक्षेसाठी निश्चित केली जाणारी शहरे या संदर्भातील सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.

CTET परीक्षा 8 फेब्रुवारीला; CBSE कडून अधिकृत नोटीस जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education)अर्थात 'सीबीएसई' (CBSE)कडून सीटीईटी (CTET)परीक्षेसंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या 8 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (Central Teacher Eligibility Test)म्हणजेच सीटीईटी परीक्षा आयोजित केली जाणार आहे.देशभरातील 132 शहरांमध्ये आणि वीस भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वच शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी प्रविष्ट होतात. तर काही उमेदवार हे ' सीबीएसई'कडून आयोजित केल्या जाणाऱ्या सीटीईटी परीक्षेसाठी प्रविष्ट होतात.

सीबीएसई कडून सीटीईटीची परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली. पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोन एकाच दिवशी घेतले जाणार आहेत. सीटीईटी संदर्भातील अधिकृत माहिती https://ctet.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे. परीक्षा, अभ्यासक्रम, भाषा, पात्रता, परीक्षा शुल्क, परीक्षेसाठी निश्चित केली जाणारी शहरे या संदर्भातील सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. परीक्षा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी संकेतस्थळावर दिलेली माहिती बारकाईने वाचावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांनी केवळ https://ctet.nic.in या संकेतस्थळावरूनच ऑनलाईन अर्ज भरावेत असेही ' सीबीएसई' कडून स्पष्ट करण्यात आले आहे.