प्रेम बिऱ्हाडे प्रकरणावर पडदा टाकण्याचे मॉडर्न कॉलेजचे आवाहन

या प्रकरणाला आपण कोणतेही राजकीय वळण देऊ नये. त्याचबरोबर जातीय रंग देऊ नये आणि याचे एक वेगळ्या पद्धतीने कुणीही भांडवल करू नये. असं मला वाटतं. या प्रकरणावर आपण इथंच पडदा टाकूयात,असे श्यामकांत देशमुख यांनी आपल्या व्हिडिओमध्ये नमूद केले आहे.

प्रेम बिऱ्हाडे प्रकरणावर पडदा टाकण्याचे मॉडर्न कॉलेजचे आवाहन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमावर गाजत असलेल्या मॉडर्न कॉलेजमधील प्रेम बिऱ्हाडे या विद्यार्थ्यांच्या (Modern College student Prem Birhade) संदर्भात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह शामकांत देशमुख (Shamkant Deshmukh Executive Director of Progressive Education Society) यांनी खुलासा करणारा व्हिडिओ नुकताच पोस्ट केला आहे. त्यात विद्यार्थ्यांशी संबंधित सर्व माहिती संकतील करून कंपनीला मेल केली असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणाला जातीय रंग न देण्याचे आणि या प्रकरणावर येथेच पडदा टाकण्याचे आवाहन केले आहे.

मॉडर्न कॉलेजचा माजी विद्यार्थी  प्रेम बिऱ्हाडे याने समाज माध्यमातून काही पोस्ट केल्यानंतर एक मेल आम्हाला त्याच्या जॉबच्या संदर्भात थर्ड पार्टी एजन्सीकडून प्राप्त झाली होती, त्या संदर्भात त्याने समाज माध्यमातून पोस्ट प्रसिध्द करून काही तक्रारी केल्या होत्या. त्या अनुशंगाने प्रसार माध्यमांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. काही संघटनांनी कॉलेजासमोर आंदोलन केले. तसेच विद्यापीठाकडे या संदर्भात चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.त्यावर आता मॉडन महाविद्यालाय व प्रोग्रेसिव्ह एजुकेशन सोसाइटीच्या वतीने मॉडर्न कॉलेजचे उपप्राचार्य व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह शामकांत देशमुख यांनी व्हिडिओ पोस्ट करून खुलासा केला आहे. 

शामकांत देशमुख यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, सदर चा विद्यार्थी हा मॉडन कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालाय मध्ये बीबीए अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2021, 2021-22 व 2022-23 या तीन वर्षाच्या कालावधी मध्ये शिकत होता. या विद्यार्थ्याने हा अभ्यासक्रम 2023 मध्ये पूर्ण केला. सदर चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्याने पुढील शिक्षणासाठी, त्याचबरोबर भवितव्यासाठी महाविद्यालायाकडून लेटर ऑफ रिकमेंडेशनची विनंती केली होती. त्याला दोन लेटर ऑफ रिकमेंडेशन, शिफारस पत्राबरोबर या विद्यार्थ्याकडे सहा समिस्टरचे मार्कशीट्स, त्याच बरोबर पासिंग सर्टिपिकेट, डिग्री सर्टिपिकेट, हे महाविद्यालायने वेळोवेळी या विद्यार्थ्याला दिले आहेत. तसेच हे सर्व त्या विद्यार्थ्याकडे होते. आणि त्यामूळेच त्याला उच्च शिक्षणा साठी यूके सारख्या देशामध्ये शिक्षणाची संधी मिळाली होती. उच्च शिक्षण प्राप्त केल्यानंतर प्रेम बिऱ्हाडे विद्यार्थ्याने एव्हिएशशी संबंधित कंपनीमध्ये यूके मध्ये नोकरीसाठी अर्ज दाखल केला होता.

या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक तपासनी अहवालासंबंधी आमाला सर्वप्रथम 30 सप्टेंबरला थर्ड पार्टी कंसल्टंसीकडून एक मेल प्राप्त झाला होता. सदरच्या मेल मध्ये कोणती माहिती किती दिवसात भरून द्यावी, काय प्रोफार्मा भरून द्यावा,असा कोणत्याही उल्लेख नव्हता. त्यामुळे आम्ही महाविद्यालय स्तरावर या विषयाची माहिती संकलन करायला सुरूवात केली. मुख्यत्वे या विद्यार्थ्याचा कालावधी हा कोरोना ,कोविड पेंडमिक मधला असल्यामुळे साजीकच सदरची माहिती संकलित करण्यास थोड़सा कालावधी लागला. तसेच तो कालावधी लागणे अभिप्रेत ही होते.

हेही वाचा : जातीवादामुळे कागदपत्रे तपासण्यास नकार; आंबेडकरांचे पुण्यातील मॅडर्न काॅलेजवर गंभीर आरोप

हा विद्यार्थी ज्या वेळी एव्हिएशन क्षेत्राशी संबंधित कंपनीमध्ये अर्ज करतो, त्यावेळी त्याला  एवीयेशन शेत्राश्य सम्बंदित कमपनी मधे अर्ज दाखल करतो याला एव्हिएशन अॅक्ट 1982 त्याचबरोबर त्यर एव्हिएशन मेरिटाइम अमेडड अॅक्ट 1990 या दोनी अॅक्टच्या तरतुदी प्रमाने महाविद्यालयांकडून किंवा महाविद्यालय प्रशासनाकडून कोणती जर माहिती चुकीची, अक्षेपार्य, दिशाभूल करणारी जर गेली तर साजीकच हा गुन्हा होऊ शकतो. त्यामुळे ही माहिती संवेदनशील व गोपनीय स्वरूपाची असल्याने महाविद्यालयाने याबाबत खबरदारी घेतली. त्याचप्रमाणे हे सर्व प्रकरण थर्ड पार्टीशी संबंधत होते. त्यामुळे त्रयस्थ व्यक्तिने यामध्ये हस्तक्षेप करणे पूर्णपणे चूकीचे होते,असे अवर्जुन नमूद करावेसे वाटते.

या संदर्भातील संपूर्ण माहिती ही महाविद्यालयाने संकलित केली असून तशा आशयाचा मेल त्याचबरोबर बोनाफाइड सर्टिफीकेट आणि प्रोफार्मा मध्ये अपेक्षित असलेली माहिती ही या थर्ड पार्टी कंसल्टन्सीला मेल केली आहे. मला या माध्यमातून सर्वांना असे आवाहन करायाचे आहे की आम्हाला आमच्या विद्यार्थ्याला यूके सारख्या देशामध्ये नामांकित अशा कंपनीमध्ये  एव्हिएशन क्षेत्रात जरा नोकरी मिळत असेल तर तर त्याचा प्रशासन म्हणून आम्हाला त्याचा निश्चितच आनंद आणि अभिमान आहे. त्यामुळे महाविद्यालयांकडून विद्यार्थ्याला आम्ही शुभेच्छा देतो. पण विनाकारण, काही कारण नसताना समाज माध्यमातून या संदर्भात खूप उलटसुलट चर्चा होत आहेत. त्याचबरोबर संस्था, महाविद्यालय, महाविद्यालयाचे पदाधिकारी, प्राचार्य यांच्या बाबत काही आक्षेपार्ह वक्तव्य विधाने केली जात आहेत.तसेच मानहानीकारक अशी बदनामी केली जात आहे. कृपा करून सर्वांनी ही थांबवावी. 

विद्यार्थ्यांशी संबंधित कंपनीशी संबंधीत असलेली सर्व कार्यवाही कंपनीला मेलद्वारे कळविण्यात आली आहे. तसेच इतर लागणारी कागदपत्रे देखील मेलद्वारे कळवलेली आहेत. त्यामुळे मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करायची की या प्रकरणाला आपण कोणतेही राजकीय वळण देऊ नये. त्याचबरोबर जातीय रंग देऊ नये आणि याचे एक वेगळ्या पद्धतीने कुणीही भांडवल करू नये. असं मला वाटतं. या प्रकरणावर आपण इथंच पडदा टाकूयात,असे देशमुख यांनी आपल्या व्हिडिओमध्ये नमूद केले आहे.