शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची दिवाळी; या अधिकाऱ्यांना पदोन्नती

शिक्षण अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षण उपसंचालक व समक्ष पदावर सुधारित वेतन संरचनेत तात्पुरती पदोन्नती देण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या शासन निर्णयामध्ये 10 अधिकाऱ्यांना पदोन्नती दिल्याचा उल्लेख आहे.

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची दिवाळी; या अधिकाऱ्यांना पदोन्नती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण सेवा गट-अ मधील शिक्षण अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षण उपसंचालक व समक्ष पदावर सुधारित वेतन संरचनेत तात्पुरती पदोन्नती देण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या शासन निर्णयामध्ये 10 अधिकाऱ्यांना पदोन्नती दिल्याचा उल्लेख आहे.मात्र, ही पदोन्नती तात्पुरती स्वरूपाची असल्यामुळे तात्पुरत्या पदोन्नतीच्या परिणामी निवड सूचीतील अधिकाऱ्यांना नियमितपणाचा व सेवाजेष्ठतेचा कोणताही हक्क मिळणार नाही, असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील कैलास दातखीळ यांना छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. पुणे येथील दीपक माळी यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा राज्य मंडळ येथे सचिव पदी पदोन्नती दिली आहे. तेजराव काळे यांना शिक्षण आयुक्त कार्यालयात शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच पुण्यातील पुष्पावती पाटील यांना प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयात शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती मिळाली आहे.

छत्रपती संभाजी नगर येथील सुचिता रोडगे (पाटेकर) यांना पुणे येथील माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयात शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. स्मिता गौड यांना शिक्षण आयुक्त कार्यालयात शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती मिळाली असून कोकण येथील भावना राजनोर यांना मुंबईतील शालेय शिक्षण विभागात जनसंपर्क अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. पुण्यातील प्रिया शिंदे यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत उप आयुक्त म्हणून पदोन्नती दिली आहे. तसेच प्रभावती कोळेकर यांना कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील एकनाथ अंबोकर यांना माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयात शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.