तिसरा टप्पा! 'मुख्यमंत्री सुंदर शाळा' अभियानाला ३ नोव्हेंबरपासून सुरूवात, कोट्यावधींची बक्षिसे..

मुख्यमंत्री सुंदर शाळा' या अभियानामध्ये विविध स्तर आणि वर्गवारीमध्ये विजेत्या शाळांना एकूण ७२ कोटी २२ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत विभागण्यात आले आहे. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येणार आहे.

तिसरा टप्पा! 'मुख्यमंत्री सुंदर शाळा' अभियानाला ३ नोव्हेंबरपासून सुरूवात, कोट्यावधींची बक्षिसे..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना 'मुख्यमंत्री सुंदर शाळा' या अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याला ३ (Third phase of the campaign) नोव्हेंबरपासून सुरुवात  (Starting from November 3) होणार असून यामध्ये विजेते ठरणाऱ्या शाळांना कोट्यावधींची बक्षिसे देण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. 'मुख्यमंत्री सुंदर शाळा' (Chief Minister's Beautiful School) या अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यास शासनाने मान्यता दिली असून, १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. २०२५-२६ मध्ये हे स्पर्धात्मक अभियान काही नवीन उपक्रमांसह राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्राध्यापक भरती खोळंबली? जाचक अटींमुळे ९९ टक्के उमेदवारांना फटका..

मुख्यमंत्री सुंदर शाळा' या अभियानामध्ये विविध स्तर आणि वर्गवारीमध्ये विजेत्या शाळांना एकूण ७२ कोटी २२ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत विभागण्यात आले आहे. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येणार आहे. हे अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र, वर्ग '' आणि वर्ग ''च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर राबवण्यात येणार आहे.

या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी २४ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ हा कालावधी असेल. ३ नोव्हेंबरला अभियानाची सुरुवात होईल. ३१ डिसेंबरला अभियानाचा कालावधी पूर्ण होईल. १ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया होईल. मागील वर्षीच्या टप्पा-एक किंवा टप्पा-दोनमध्ये प्राप्त झालेला क्रमांक किंवा त्यापेक्षा खालच्या (निम्न) क्रमांकासाठी शाळेचा विचार केला जाणार नाही.

शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याच्या महत्त्वकांक्षी उद्दिष्टातून ही योजना राबविली जात आहे. स्पर्धेतील शाळांना पायाभूत सुविधा- ३८ गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी- १०१ गुण आणि शैक्षणिक संपादनुकीसाठी- ६१ गुण असे एकूण २०० गुण असणार आहेत.