डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त भार

डॉ. चंदनवाले यांच्याकडे 'एमयुएचएस' च्या कुलगुरू पदाबरोबर वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक (डीएमईआर) या पदाचीही धुरा असणार आहे. 'एमयुएचएस' च्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या होत्या. त्यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त पदावर डॉ. चंदनवाले यांची नियुक्ती झाली आहे.

डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त भार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती (Chancellor of the University) आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयुएचएस) कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार (Additional charge of the post of Vice Chancellor) मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले (Dr. Ajay Chandanwale) यांच्याकडे सोपविला आहे. विद्यापीठाच्या माजी कुलगुरू ले. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यामुळे हे पद मागील काही दिवसांपासून रिक्त झाले होते. त्यानंतर आता चंदनवाले यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढील सहा महिन्यांसाठी असेल.

युको बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, ५३२ पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात

डॉ. चंदनवाले यांच्याकडे 'एमयुएचएस' च्या कुलगुरू पदाबरोबर वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक (डीएमईआर) या पदाचीही धुरा असणार आहे. याआधी 'एमयुएचएस' च्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या होत्या. त्यांचा कार्यकाळ १४ ऑक्टोबर रोजी संपल्याने त्या सेवानिवृत्त झाल्या असून रिक्त पदावर डॉ. चंदनवाले यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. चंदनवाले यांनी ससून रुग्णालयात अधिष्ठाता पदावर दहा वर्षे होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ससून रुग्णालयात विविध उपक्रम व योजना राबवत रुग्णालयामध्ये सुधारणा केली.

कोरोना काळात (२०२०) डॉ. अजय चंदनवाले त्यांची नियुक्ती 'डीएमईआर'च्या सहसंचालक पदावर झाली. तर जुलै २०२३ मध्ये ते प्रभारी संचालक झाले. तर काही महिन्यांपूर्वी ते पूर्णवेळ संचालक देखील झाले. आता त्यांच्याकडे एमयुएचएस' च्या कुलगुरुपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.