सीसीएमटी फेरी २ जागा वाटप निकाल २०२५ जाहीर

अधिकृत सूचनेनुसार, तिसऱ्या फेरीच्या वाटपाचा निकाल २७ जून २०२५ रोजी जाहीर केला जाणार आहे.

सीसीएमटी फेरी २ जागा वाटप निकाल २०२५ जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

एम. एससी./एम. एससी. (टेक.) प्रवेशासाठी (M.Sc, M.Sc tech) सेंट्रलाइज्ड कौन्सिलिंगने, (centralise counselling) २१ जून २०२५ रोजी दुसऱ्या राउंड एलॉटमेंटचा (second round allotment result) निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी (candidates) सीसीएमएन प्रवेशासाठी नोंदणी (admission registration process) केली आहे आणि पर्याय सादर केले आहेत ते ccmn.admissions.nic.in या अधिकृत वेबसाइट वर सीट अलॉटमेंटचा निकाल पाहू शकतात .

सीसीएमटी-२०२५ ही परीक्षा एम.टेक./ एम.आर्क./ एम.प्लॅन. कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते, जी उमेदवारांच्या २०२३, २०२४ आणि २०२५ च्या गेट स्कोअरवर आधारित असते.

जागा वाटप कसे तपासायचे?

सर्वप्रथम ccmn.admissions.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर अ‍ॅक्टिव्हिटी बोर्ड अंतर्गत, "CCMN 2025 साठी दुसऱ्या फेरीतील जागा वाटप निकाल" वर क्लिक करा. तुमचा JAM नोंदणी आयडी, पासवर्ड आणि सुरक्षा पिन एंटर करा. "साइन" वर क्लिक करा. तुमच्या सीट अलॉटमेंटचा निकाल स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाउनलोड करा आणि जतन करा. 

या निकालाच्या प्रक्रियेनंतर जागा वाटपाच्या निकालावर समाधानी असलेले उमेदवार २४ जून २०२५ (दुपारी १२:३०) पूर्वी त्यांची इच्छा (फ्रीज/फ्लोट/स्लाइड) किंवा प्रवेश प्रक्रियेतून माघार घेऊ इच्छितात की नाही हे स्पष्ट करू शकतात. 

याशिवाय उमेदवार २४ जून २०२५ पर्यंत ऑनलाइन कागदपत्रे अपलोड करू शकतात आणि जागा वाटप स्वीकृती शुल्क भरू शकतात. तसेच उमेदवारांनी २५ जून २०२५ (दुपारी १२:३०) पर्यंत ऑनलाइन कागदपत्र पडताळणी प्रक्रिया, माघार किंवा इच्छुकतेबाबत प्रश्न उपस्थित करावेत असेही सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, अधिकृत सूचनेनुसार, तिसऱ्या फेरीच्या वाटपाचा निकाल २७ जून २०२५ रोजी जाहीर केला जाणार आहे.