प्रियदर्शनी स्कूलच्या स्नेहसंमेलनातून मनोरंजन अन् जीवनाचा संदेश 

' मी हे करू शकतो ' हा प्रतेक विद्यार्थ्याला आत्मविश्वास देणारा संदेशही या कार्यक्रमातून दिला गेला.

प्रियदर्शनी स्कूलच्या स्नेहसंमेलनातून मनोरंजन अन्  जीवनाचा संदेश 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

प्रियदर्शनी स्कूलचे (Priyadarshani School )संस्थापक माननीय श्री स्वर्गीय इंद्रमन सिंगजी यांनी भोसरी येथे सूरू केलेल्या शाळेच्या शाखा दिवसेंदिवस वाढत गेल्या आणि त्याचे रूपांतर जणूकाही एका वट वृक्षात झाले.या शाळेतील मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान दिले जात नाही तर जीवन जगण्याची खरी शिकवण दिली जाते,अशा या पुण्यातीलच नाही तर देशातील नामकीत शाळांच्या यादीत आदराने नाव घेतल्या जाणाऱ्या प्रियदर्शनी स्कूलचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.केवळ गीत संगीत व मनोरंजन नाही तर विद्यार्थ्यांना व उपस्थित रसिक प्रेक्षकांना या कार्यक्रमातून "केवळ स्वत:साठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगा" हा मूलमंत्र दिला.

प्रियदर्शनी स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये किमया 2024 हा मनोरंजनात्मक कार्यक्रम  सादर करण्यात आला.' मी हे करू शकतो ' हा प्रतेक विद्यार्थ्याला आत्मविश्वास देणारा संदेशही या कार्यक्रमातून दिला गेला.तसेच 'आयुष्य यशाने नाही तर अपयशाने बनते ' हा मौलिक संदेश देणारे मनमोहक रोल प्ले आणि शानदार नृत्याचे सादरीकरणात पाहून रसिक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या संस्थापक सचिव तरुणा सिंग,प्रियदर्शनी स्कूलचे व्यवस्थापकीय विश्वस्त नरेंद्र सिंग, राजेंद्र सिंग, जितेंद्र सिंग, सरिता सिंग, मुख्याध्यापिका डॉ. गायत्री जाधव, मुख्याध्यापिका अर्पिता दिक्षीत आदी मान्यवर उपस्थित होते.

एका लहानशा गावातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या आणि दिवसा काम व रात्री शिक्षण घेऊन स्व कष्टावर स्वर्गीय इंद्रमन सिंग हे अनेक अडचणींचा सामना करत स्वत:च्या पायावर उभे राहिले. ज्ञान दानाचे पुण्य काम करून त्यांनी अनेकांना रोजगार दिला आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली,अशा त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारिक्त नाटिका प्रियदर्शनी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात सादर केली.

दरम्यान, शाळेत मिळालेले संस्कार एक विद्यार्थी विसरतो आणि काहीसा भरकटतो.मात्र,त्याचा विद्यार्थ्याला स्वर्गीय इंद्रमन सिंग यांच्या शाळेत मिळालेल्या संस्कारांची आठवण होते.केवळ स्वत:साठी न जागता दुसऱ्यासाठी जगायचे आणि स्किल युनिव्हर्सिटी उभी करून बरोजगारांच्या हाताला रोजगार देण्याचे काम त्यांच्या हातून होते,असा संदेश दुसऱ्या एका समांतर नाटीकेतून देण्यात आला. विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केलेल्या या अंगळ्या वेगळ्या स्नेहसंमेलनाची सांगता होते आणि टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह दणाणून जाते.शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचे प्रेक्षक व पालकांकडून मोठे कौतुक केले.