प्रश्नपत्रिकेतच छापली उत्तरे; तंत्रज्ञान विद्यापीठाचा ढिसाळ कारभार, अभाविप आक्रमक

परीक्षा सारख्या महत्त्वाच्या व्यवस्थापनेतील अनियोजनासाठी प्रशासकीय अधिकारी हे किती बेजबाबदार आणि अकार्यक्षम आहेत असे लक्षात येते, अशी टीका अभाविपकडून करण्यात आली आहे.

प्रश्नपत्रिकेतच छापली उत्तरे; तंत्रज्ञान विद्यापीठाचा ढिसाळ कारभार, अभाविप आक्रमक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील (BATU) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षेदरम्यान (Engineering Examination) सोमवारी इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या इन्फर्मेशन थेअरी अँड कोडिंग या सहाव्या सत्राच्या पेपरमध्ये परीक्षा विभागाकडून चक्क प्रश्नपत्रिकेतच उत्तर छापण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) संबंधित प्राध्यापकांवर कारवाईची मागणी केली आहे.

विद्यापीठ दर वर्षी परीक्षा घेत असून देखील अद्यापही परीक्षेचे योग्य व्यवस्थापन करता न येणे  म्हणजे विद्यापीठाचे एक प्रकारे अपयश आहे. परीक्षा सारख्या महत्त्वाच्या व्यवस्थापनेतील अनियोजनासाठी प्रशासकीय अधिकारी हे किती बेजबाबदार आणि अकार्यक्षम आहेत असे लक्षात येते, अशी टीका अभाविपकडून करण्यात आली आहे.

SPPU NEWS: कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून बेमुदत आंदोलन, विद्यापीठाचा निकाल लांबण्याची शक्यता

अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री नागेश गलांडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या या विद्यापीठातील परीक्षांचे गोंधळ, विद्यार्थ्यांना होणारा नाहक त्रास, व्यवस्थापन शून्य परीक्षा यामुळे विद्यापीठाची बदनामी होत आहे. परिक्षा संचालकांची तात्काळ चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी. तसेच  विद्यापीठाचा हा अनागोंदी कारभार बंद करावा, अशी मागणी गलांडे यांनी केली आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील परिक्षा विभागात सातत्याने ढिसाळ कारभार सुरू आहे हे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. विद्यापीठ प्रशासन वारंवार अशा चूका करून हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळत आहे. प्रश्नपत्रिकेत झालेल्या त्रुटी मध्ये जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तींची व परीक्षा संचालकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अन्यथा विद्यार्थ्यांच्या नुकसानीस जबाबदार असलेल्या विद्यापीठ प्रशासनास विद्यार्थ्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशारा अभाविपकडून देण्यात आला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD